मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गौप्यस्फोट करत देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर केले खळबळजनक आरोप

गौप्यस्फोट करत देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर केले खळबळजनक आरोप

आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी पुराव्यासह मोठा गौप्यस्फोट केला.

आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी पुराव्यासह मोठा गौप्यस्फोट केला.

आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी पुराव्यासह मोठा गौप्यस्फोट केला.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 09 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी पुराव्यासह मोठा गौप्यस्फोट केला.

मुंबईतील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणी नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या कंपनीनं गुन्हेगाराकडून तीन एकर जमीन फक्त 30 लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिकांनी 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन विकत घेतली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. हे सर्व पुरावे मी तपास यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

फडणवीसांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, शाह वली खान आणि सलीम पटेल या दाऊदच्या दोन निकटवर्तींयाकडून नवाब मलिक यांनी जागा विकत घेतली. या दोघांवरही 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी केवळ 30 लाख रुपयांत जागा विकत घेतली.

देवेंद्र फडणवीसांचे सवाल

कुर्ल्यातील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणावर तीन एकर जमीन फक्त 30 लाखात कशी घेतली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. ज्या लोकांकडून मलिकांच्या कंपनीनं जमीन घेतली ते 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. गुन्हेगाराकडून मलिकांनी जमीन कशी विकत घेतली?, असा सवालही त्यांनी मलिकांना विचारला आहे.

हेही वाचा-  "उद्या 10 वाजता मुंबईत हायड्रोजन बॉम्ब फुटणार''

कुर्ल्यातील त्या जागेच्या मागेच पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर आणखी एक जागा 2005 मध्ये मलिकांच्या कुटुंबियांनी विकत घेतली होती. याच भागातील फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला येथेही 2005 साली जमीन घेतली. मलिकांची कंपनी सॉलिडसनं दोन अंडरवर्डच्या लोकांकडून फक्त 25 रुपये स्क्वेअर फुटानं जमीन विकत घेतली, अशी माहिती फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

2003 मध्ये जागेचा व्यवहार झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. नवाब मलिक या कंपनीत 2019 पर्यंत होते. मंत्री झाल्यावर त्यांनी त्या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला. ही जमीन त्यांनी खरेदी केली तेव्हा रेट 2 हजार स्क्वेअर फुटने केली गेली. अंडरवर्ल्ड करुन खरेदी केलेली जमीन 30 लाखात खरेदी केली गेली. पेमेंट झालं 20 लाख. सलीम पटेलच्या अकाऊंटवर हे 15 लाख रुपये गेले. उर्वरित रक्कम शाह वली खानला मिळाले, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांनी पुढे सांगितलं की, सरदार शहाबली खान हा 1993 चे गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली आहे तो तुरुंगात आहेत. त्याची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये बॉम्ब ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी केली होती.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडताच नवाब मलिकांनी केलं नवं Tweet

टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हे उपस्थित होते. टायगर मेमनच्या गाडीत आरडीएक्स भरलं गेलं. त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारांनतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे. त्यामध्येही हे सहभागी होते. मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी आर. आर. पार्टी एका इफ्तार पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर एका दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला होता. तो माणूस म्हणजे, सलीम पटेल,असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

आर. आर. पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, फोटोमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

हेही वाचा- राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरेही करणार नव्या घरात गृहप्रवेश

मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे. दाऊची बहिण हसीना पारकरचे ते चालक होते. या दोन जणांसोबत मलिकांचे संबध आहेत. यांच्याकडून मलिकांनी जमीन खरेदी केली. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis