मुंबई राष्ट्रवादीची सूत्र अखेर नवाब मलिकांच्या हाती, पवारांनी अध्यक्षपदी केली नियुक्ती

मुंबई राष्ट्रवादीची सूत्र अखेर नवाब मलिकांच्या हाती, पवारांनी अध्यक्षपदी केली नियुक्ती

शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी अखेर नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर मुंबईच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. नवाब मलिक यांचा अनुभव आणि पक्षनिष्ठा पाहून अखेर शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

नवाब मलिकांच्या नावाला होता नेत्यांचा विरोध

सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा मुंबई अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर नवाब मलिक यांचं नाव अध्यक्षपदासाठी समोर आलं. परंतु पक्षातील काही नेत्यांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नव्हतं. पण आज अखेर शरद पवार यांच्याकडून नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

मुंबईतील राष्ट्रवादीची स्थिती

महाराष्ट्रात 1999 पासून 15 वर्ष सत्तेत असून ही मुंबईत प्रभाव पाडण्यात राष्ट्रवादीला यश आलं नाही. शिवसेनेतून छगन भुजबळ राष्ट्रवादीत आले आणि मुंबईत पक्षाला चेहरा मिळाला. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन अहिर यांनी मुंबईत कामगार संघटना बांधल्या आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादीची काहीशी संघटनाबांधणी झाली. आधी म्हाडाचे अध्यक्ष आणि नंतर गृहनिर्माण राज्यमंत्री असा राजकीय प्रवास करत सचिन अहिर हे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या प्रबळ होत गेले. पण मुंबईत राष्ट्रवादीला अपेक्षित प्रभाव पाडता आला नाही. आता नवाब मलिक पक्षवाढीसाठी नेमकी काय पाऊलं उचलतात, हे पाहावं लागेल.

VIDEO: मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Published by: Akshay Shitole
First published: August 5, 2019, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading