Home /News /maharashtra /

मला विचारून लफडं केलं का? नवनीत राणांचा पीडितेला उलट सवाल, AUDIO क्लिप व्हायरल

मला विचारून लफडं केलं का? नवनीत राणांचा पीडितेला उलट सवाल, AUDIO क्लिप व्हायरल

नवनीत राणा यांच्या या उत्तरामुळे पीडित महिला दुखावली गेली. त्यानंतर या पीडित महिलेने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे.

नवनीत राणा यांच्या या उत्तरामुळे पीडित महिला दुखावली गेली. त्यानंतर या पीडित महिलेने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे.

नवनीत राणा यांच्या या उत्तरामुळे पीडित महिला दुखावली गेली. त्यानंतर या पीडित महिलेने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे.

    अमरावती, 22 जानेवारी :अमरावतीच्या (amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana audio clip viral) नेहमी या ना त्या वादामुळे कायम चर्चेत असतात.  मग तो जात पडताळणीचा वाद असो किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका असो. पण आता आपल्याच एका कार्यकर्त्याच्या बचावासाठी नवनीत राणा यांनी एका महिलेला अर्वाच्च भाषेत उत्तर दिले आहे. तुम्ही दुसरा लफडा केला ते मला विचारून केलं का? असा असभ्य सवालच राणा यांनी या महिलेला विचारला आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उपेन बच्छेले नामक अचलपूर येथील पदाधिकारी आहे. या बच्छेले पदाधिकाऱ्याने आपली फसवणूक केल्याची तक्रार एका पीडित महिलेनं फोन द्वारे नवनीत राणा यांच्याकडे होती. या पदाधिकाऱ्याचे पहिले लग्न झालेले असताना देखील त्याने पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले. त्यानंतर पहिली पत्नी आणि 18 महिन्याच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप या महिलेनं केला होता. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दाद मागण्यासाठी नवनीत राणा यांना फोन केला होता. (नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता' छगन भुजबळांचा इशारा) पण 'तुम्ही दुसरा लफडा केला तो काय मला विचारून केला का?' असा उलट सवाल विचारून नवनीत राणा यांनी पीडित महिलेला अपमानीत केले. नवनीत राणा यांच्या या उत्तरामुळे पीडित महिला दुखावली गेली. त्यानंतर या पीडित महिलेने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे. मात्र , आपण या महिलेचं मन दुखावलं नसून यात माझा काय सहभाग अशा सौम्य भाषेत मी तिला प्रतिउत्तर दिले आहे, असं राणा यांनी सांगितलं आहे.  सध्या नवनीत राणा या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी पुढील प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या