Home /News /maharashtra /

नवनीत राणांना आवरला नाही कैरी घेण्याचा मोह; विनामास्क केली रस्त्यावर खरेदी, VIDEO

नवनीत राणांना आवरला नाही कैरी घेण्याचा मोह; विनामास्क केली रस्त्यावर खरेदी, VIDEO

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज अमरावती शहरात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी कैरी विक्रेत्याकडून कैऱ्या विकत घेत्तल्या. मात्र खासदार नवनीत राणा यांना या दरम्यान कोरोना नियमांचा विसर पडला.

  अमरावती, 8 जुलै: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज अमरावती शहरात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी कैरी विक्रेत्याकडून कैऱ्या विकत घेत्तल्या. मात्र खासदार नवनीत राणा यांना या दरम्यान कोरोना नियमांचा विसर पडला. त्यांनी स्वतः तोंडाला मास्क लावलेला नव्हता, तर त्यांनी यावेळी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगही पाळलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कोरोना नियमांचा फज्जा उडावल्याचं पाहायला मिळालं. तसंच, अमरावतीमध्ये त्यांनी फूटपाथवरील एका हातगाडीवर एक डोसेवाल डोसा बनवत असल्याचं पाहून त्यांनी स्वतः देखील डोसा बनवला.  त्यानंतर त्यांनी डोसाही खावून याची चवही बघितली. त्याशिवाय त्यांनी सार्वजनिक ठिकाणी चहाचा आस्वाद घेत सेल्फी फोटो काढत दुकानदाराची विचारपूस केली. या सर्व गोष्टी करताना त्यांनी मास्क न लावताच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं.

  (वाचा - 11 बड्या मंत्र्यांचे राजीनामे मागणारा 'तो' एक कॉल कुणी केला)

  दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रवि राणा यांनी भुयारी मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी विना मास्क गर्दी जमवली होती. त्या प्रकरणी रवी राणा यांच्यावर राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार मास्क (Mask) घालण्याचं सरकारकडून आवाहन केलं जात आहे. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कोरोनाचे नियम (Corona rules) याआधीही पायदळी तुडवले होते. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केलं होतं. परंतु, हे करत असताना नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणांना मास्क घालण्याचा विसर पडला होता. तसंच मेळघाटात राणा दाम्पत्यांनी विना मास्क क्रिकेट मॅच खेळत कोरोना नियम पाळले नव्हते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Coronavirus, Navneet Rana

  पुढील बातम्या