संजय शेंडे, प्रतिनिधी
अमरावती, 12 जानेवारी : 2014 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा आणि शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांच्यातील वाद पेटण्याची चिन्ह आहे. नवनीत राणा यांची पुनर्विचार याचिका न्यायालयाने मंजूर केली आहे. त्यामुळे अडसूळ यांच्या विरोधात विनयभंगाचा खटला होणार नव्याने सुरू आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीपूर्वी एका टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांचा दरम्यान, वाद झाला होता.
या वादानंतर नवनीत कौर राणा यांनी अडसूळ यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गाडगेनगर पोलिसांनी निकाली काढली होती. मात्र, प्रकरण निकाली काढताना तक्रारदार नवनीत राणा यांना कळवण्यात आलं नव्हतं. अडसूळ यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून हे प्रकरण निकाली काढल्याचा आरोप नवणीत राणा यांनी केला आहे.
त्यानंतर त्यांनी राणा यांनी 4 जून 2018 रोजी विलंब माफी आणि पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
या प्रकरणी शुक्रवारी दोन्ही पक्षाचा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तिवारी यांनी ही याचिका मंजूर केली. यामुळे खासदार अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
========================