Home /News /maharashtra /

राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता, सुटकेनंतर करावं लागणार 'या' पाच अटींचं पालन

राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता, सुटकेनंतर करावं लागणार 'या' पाच अटींचं पालन

राणा दाम्पत्याला (Rana couple) काल जामीन मंजूर झाला. त्यामुळे अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) दिलासा दिला आहे.

    मुंबई, 05 मे: राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला (Rana couple) काल जामीन मंजूर झाला. त्यामुळे अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) दिलासा दिला आहे. काल राणा दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली. आज या दाम्पत्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान तुरुंगातून दोघांची सुटका झाल्यानंतर त्यांची भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya)  भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय. राणा दाम्पत्य तुरुंगातून सुटल्यानंतर किरीट सोमय्या त्यांच्या खार येथील निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहे. सुत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना (Navneet Rana and Ravi Rana) जामीन मिळाला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलम 153A आणि 124A विरोधात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. या पाच अटींवर जामीन मंजूर मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यनंतर पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयानं घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई असेल. तसंच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयानं दिलेत. या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशीह एक अट न्यायालयाकडून घातली आहे. राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असं ही सांगण्यात आलं आहे. न्यायालयानं घातलेल्या या अटींचं पालन राणा दाम्पत्याला करावं लागणार आहे. नेमकं प्रकरण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार करत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) अमरावतीहून मुंबईत आले. त्यानंतर झालेल्या संघर्षानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. 24 एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Navneet Rana, Ravi rana

    पुढील बातम्या