शिवसेनेचं पार्सल मुंबईला पाठवणारच, नवनीत राणांचं अमरावतीत ओपन चॅलेंज

'गेल्या साडेचार वर्षांपासून मी मोठ्याप्रमाणात जनसंपर्क वाढवला आहे. माझा जनसंपर्क आणि स्थानिक खासदारांची निष्क्रीयता यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे' असं मत नवनीत राणा यांनी न्यूज१८ लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 01:46 PM IST

शिवसेनेचं पार्सल मुंबईला पाठवणारच, नवनीत राणांचं अमरावतीत ओपन चॅलेंज

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 31 मार्च : पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवणुकांचा प्रचार रंगात आला आहे. अशातच राजकीय आरोप प्रत्यारोपांनी जोर धरला. अमरावती लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा गेल्या निवडणूकीत पराभव झाला होता. पण यावेळीसुध्दा नवनीत राणा निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत आणि त्यांच्यासमोर गेल्या पंचवीस वर्षापासून खासदार असणारे शिवसेनेचे उमेदवार अडसूळ यांचे आव्हान आहे.

'गेल्या साडेचार वर्षांपासून मी मोठ्याप्रमाणात जनसंपर्क वाढवला आहे. माझा जनसंपर्क आणि स्थानिक खासदारांची निष्क्रीयता यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे' असं मत नवनीत राणा यांनी न्यूज१८ लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. दरम्यान, त्यांचा सामना मुळचे मुंबईचे असलेल्या अडसूळ यांच्याशी होणार आहे.

गेल्या निवडणूकीत विरोधक आणि राणा यांच्यात टोकाचे वाद झाले होते. हेच वाद आणि आरोपमुळे दोन्ही उमेदवारांना न्यायालय आणि पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली होती. त्यामुळे जर मी माघार घेतली असती तर संपूर्ण महिला जातीचा आत्मविश्वास ढासळला असता. म्हणून आता माघार नाही असा पवित्रा नवनीत राणा यांनी घेतला आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, 'माझे पहिले राजकीय गुरू हे माझे पती आमदार रवी राणा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात मी निवडून आले आणि नाही आले तरी लोकहीताची कामं सुरूच ठेवणार' असा संकल्प नवनीत राणा यांनी निवडणूकीच्या प्रचारादरम्यान केला आहे.

Loading...

नवनीत राणा विरूद्ध सेना खासदार आनंद अडसुळ

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीपूर्वी एका टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांचा दरम्यान, वाद झाला होता.

या वादानंतर नवनीत कौर राणा यांनी अडसूळ यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गाडगेनगर पोलिसांनी निकाली काढली होती. मात्र, प्रकरण निकाली काढताना तक्रारदार नवनीत राणा यांना कळवण्यात आलं नव्हतं. अडसूळ यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून हे प्रकरण निकाली काढल्याचा आरोप नवणीत राणा यांनी केला.

त्यानंतर त्यांनी राणा यांनी  4 जून 2018 रोजी विलंब माफी आणि पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

या प्रकरणी दोन्ही पक्षाचा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तिवारी यांनी ही याचिका मंजूर केली. यामुळे खासदार अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली  होती.

VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...