मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : 'हिंदू शेरणी नवनीत राणा', उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले; मातोश्रीबाहेर लागले पोस्टर

Video : 'हिंदू शेरणी नवनीत राणा', उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले; मातोश्रीबाहेर लागले पोस्टर

'मातोश्री'बाहेर पोस्टरबाजी

'मातोश्री'बाहेर पोस्टरबाजी

खासदार नवनीत राणांकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलं आहे. 'मातोश्री' बाहेर जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 मार्च, विशाल पाटील :  खासदार नवनीत राणांकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलं आहे. 'मातोश्री' बाहेर नवनीत राणा हिंदू शेरणी अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. 'जो प्रभु श्री राम का नहीं, श्री हनुमान का नहीं वो किसी काम का नहीं ' अशा अशयाचा मजकूर बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरमुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसेवरून वातावरण तापलं होतं. नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलंय का असा सवाल उपस्थित होत आहे.

बॅनरमध्ये नेमकं काय? 

काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न  केला होता. यावरून नवनीत राणा आणि खासदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राना दाम्पत्य चौदा दिवस तरुंगात होते. आता पुन्हा एकदा उद्ध ठाकरे यांना डिवचण्यात आलं आहे. मोतोश्रीबाहेर नवनीत राणा हिंदू शेरणी अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. 'जो प्रभु श्री राम का नहीं, श्री हनुमान का नहीं वो किसी काम का नहीं ' अशा अशयाचा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे.

" isDesktop="true" id="858232" >

राणांचा हटके अंदाज  

दरम्यान खासदार नवनीत राणा यांचा एक नवीन व्हिडिओ रामनवमीच्या दिवशी समोर आला आहे. डोक्यावर भगवा स्कार्फ गुंडाळून त्या बुलेटवर स्वार होऊन सांगत आहे की, आम्ही अखंड विश्वाचा राजा श्री रामाचे भक्त आहोत... आम्हाला पराभवाची चिंता नाही..आणि आम्ही विजयाचा उल्लेख करत नाही... जय श्री राम. असं म्हणून खासदार नवनीत राणा हेल्मेट न घालता वेगाने बुलेट चालवताना या व्हिडीओमध्ये  दिसत आहेत.

First published:
top videos

    Tags: Navneet Rana, Ram Navami 2023, Shiv sena, Uddhav Thackeray