नवी मुंबई, 30 जानेवारी : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात गुरुवारी रात्री वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर या रस्त्यावरून मार्ग काढण्यासाठी एका बहाद्दराने इतर वाहनचालकांना चक्क रिव्हॉल्व्हरची भीती दाखवण्यास सुरुवात केली. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट केला आणि सर्वत्र खळबळ उडाली.
ट्रॅफिकमधून पुढे जाण्यासाठी रिव्हॉल्व्हरची भीती दाखवणाऱ्या व्यक्तीच्या गाडीवर शिवसेनेचा लोगोही होता. त्यामुळे या घटनेवरून शिवसेनेवरही टीका होत होती. अखेर आता या प्रकरणात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
एक्स्प्रेस वेवर बोरघाटात अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मात्र कारला रस्ता मोकळा करून देण्यासाठी बंदूक दाखवत असल्याचा व्हिडिओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शेअर केला आणि तो वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती भर रस्त्यात वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहे.
हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! @AnilDeshmukhNCP@DGPMaharashtrahttps://t.co/SaWy3UVuH6
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.