Home /News /maharashtra /

Navi Mumbai: स्पा च्या नावाखाली मसाज पार्लरमध्ये सुरू होतं Sex रॅकेट, पोलिसांनी छापा टाकून केला पर्दाफाश

Navi Mumbai: स्पा च्या नावाखाली मसाज पार्लरमध्ये सुरू होतं Sex रॅकेट, पोलिसांनी छापा टाकून केला पर्दाफाश

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Navi mumbai police busted sex racket in spa center : नवी मुंबईत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

    नवी मुंबई, 9 डिसेंबर : स्पा सेंटरमध्ये (Spa center) मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket busted) करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) ही कारवाई केली आहे. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी 9 तरुणींची सुटका केली आहे. नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर 15 मध्ये मसाजच्या नावाखाली हे रॅकेट सुरू होतं. (Sex racket running on name of Spa center in Navi Mumbai) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर 15 येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होतं अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. वाचा : Mumbai मध्ये Sex Tourism रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास या स्पा सेंटरमध्ये एक डमी ग्राहक पाठवला होता. त्यानंतर स्पा सेंटरमधील व्यक्तीने त्या ग्राहकासोबत डील केली. त्यानंतर या डमी ग्राहकाने पोलिसांना कळवले. मग पोलिसांच्या पथकाने या स्पा सेंटरवर धाड टाकत कारवाई केली आहे. घटनास्थळावरुन नवी मुंबई पोलिसांनी 9 तरुणींची सुटका केली आहे. तर स्पा सेंटरचा मॅनेजर याच्यासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही रोकडही जप्त केली आहे. वाचा : नोटांची उधळण होणाऱ्या बारमध्ये मिळाले अवघे 540 रुपये, चर्चांना उधाण शनिवारी ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ठाण्यातील कासारवडवली परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन व्यक्तींना अटक केली आहे. तर 5 महिलांची सुटका केली. या पाचही महिलांकडून जबरदस्तीने हे कृत्य करुन घेतलं जात असल्याचं बोललं जात आहे. बारामतीमध्ये Sex Racket चा पर्दाफाश पुणे जिल्ह्यातील (Pune district) बारामतीत पोलिसांनी (Baramati Police) गेल्या महिन्यात मोठी कारवाई केली आहे. बारामती पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket busted) केला आहे. बारामती शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात हा सेक्स रॅकेट सुरू होतं. पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरुन दोन महिलांची सुटका केली आहे. भाजी मंडई परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती बारामती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बारामती पोलिसांनी रात्रीच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी महिला एंजटला अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Sex racket

    पुढील बातम्या