• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नवी मुंबईत खंडणीसाठी दहशत, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अन्नू आंग्रेसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबईत खंडणीसाठी दहशत, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अन्नू आंग्रेसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

खंडणीसाठी VIDEO Game पार्लर चालकाला मारहाण, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याविरोधात गुन्हा दाखल

खंडणीसाठी VIDEO Game पार्लर चालकाला मारहाण, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याविरोधात गुन्हा दाखल

Navi Mumbai NCP leader booked in extortion case: नवी मुंबईत खंडणीसाठी एका व्हिडीओ पार्लर चालकाला मारहाण करण्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्तयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:
नवी मुंबई, 24 नोव्हेंबर : खंडणीसाठी व्हिडीओ गेम पार्लर चालकाला (Video game parlor owner) मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष अन्नू आंग्रे (NCP youth leader Annu Angre) सह आणखी सहा जणांविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Rabale MIDC police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ गेम पार्लर चालकाला मारहाण होत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद (caught in CCTV) झाली आहे. नवी मुंबईतील दिघा परिसरात महालक्ष्मी अपार्टमेंटमधील गाळा नं 6 मध्ये व्हिडीओ गेम पार्लर आहे. हे व्हिडीओ गेम पार्लर चालू ठेवण्यासाठी दरमहा 50 हजार रुपये खंडणीसाठी व्हिडीओ गेम पार्लर चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष अन्नू आंग्रेसह आणखी सहा जणांविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा : You Too गुरुजी? शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर पाठवला Porn Video, उडाला हलकल्लोळ तक्रादार पवन श्रीसैल मेलगडे हा शिरवणे गाव नेरुळ येथे राहतो. तो एक कम्प्युटर सायन्स इंजिनियर असून बेरोजगार असल्यामुळे दिघ्यातील महालक्ष्मी अपार्टमेंट मधील गाळा नं 6 मध्ये व्हिडीओ गेम पार्लर भाड्याने चालवत आहे. 19 नोव्हेंबर रोजी पवन आणि त्याचा मित्र दत्तात्रय नागरे हे दोघे व्हिडीओ गेम पार्लरमध्ये असताना राहुल आंग्रे आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदार पवन याला व्हिडीओ गेम पार्लर चालू ठेवण्यासाठी दरमहा 50 हजारांची मागणी केली. पवनने मागणी नाकारल्याने राहुल आंग्रे याने पवन याच्या कानशिलात लगावली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष अन्नू आंग्रे यांच्या सह अन्नू याचा भाऊ राहुल आंग्रे, प्रवीण अंचन (पुजारी), मंगेश टेमकर, रोशन नाईक, सुरज उर्फ पप्पू पटेना, परेश भोई सर्वजण दिघ्याचे रहिवासी असून या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा : वडिलांचं अफेअर मुलांना नाही पटलं, महिलेचा असा केला खून केली बारामती पोलिसही झाले हैराण या प्रकरणी रबाळे पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा नवी मुंबई शहरात गुंडगिरीने तोंडावर काढलाय. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी उफाळून आली तर मात्र नवी मुंबईकरांना याचा नाहक त्रास ठरणार आहे. ही गुन्हेगारी वेळीच मोडीत नाही काढली तर पोलिसांना ही डोकेदुखी ठरणार आहे.
First published: