मुलीच्या वाढदिवसा दिवशी वडिलांचा अपघाती मृत्यू

मुलीच्या वाढदिवसा दिवशी वडिलांचा अपघाती मृत्यू

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतुल गेले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला

  • Share this:

नवी मुंबई, ०५ सप्टेंबर- पनवेल जवळील तळोजा एमआयडीसी येथे पहाटे ०३.३० वाजता वाहतुक पोलीस कर्मचारी अतुल घागरे यांचा अपघाती मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी ड्युटीवर होता. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतुल गेले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. हा मृत्यू इतका गंभीर होता की, त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या अपघातामुळे पोलीस खात्याच्या कारभारावर प्रश्नःचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तसेच वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अतुल घागरे यांची पत्नीही पोलीस खात्यात आहे. त्या रबाळे पोलीस ठाण्यात पोलीस आहे. तर आज अतुल यांच्या मुलीचा वाढदिवस आहे.

अतुल यांच्या अपघाती मुत्यूमुळे संपूर्ण घागरे कुटुंबियांना धक्का बसला आहे. सध्या त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून अतुल यांना ज्या गाडीने उडवले त्या गाडीचा पोलीस तपास करत आहेत. एकंदरीतच वाहतुक पोलिसांवर असलेल्या कामाचा त्राण आणि त्यातून घडणाऱ्या घटना यांच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

VIDEO : 'मी पुलाखाली अडकलो, तुम्ही मला ओळखता का?'

First published: September 5, 2018, 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading