मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /SPECIAL REPORT : प्रकल्पग्रस्त आंदोलकांना गणेश नाईक का झाले नकोसे?

SPECIAL REPORT : प्रकल्पग्रस्त आंदोलकांना गणेश नाईक का झाले नकोसे?

म्हणूनच 400 गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कोणत्याही नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना या आंदलनाचे निमंत्रण दिले नाही.

म्हणूनच 400 गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कोणत्याही नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना या आंदलनाचे निमंत्रण दिले नाही.

म्हणूनच 400 गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कोणत्याही नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना या आंदलनाचे निमंत्रण दिले नाही.

नवी मुंबई, 17 मार्च :  भाजपचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) नवी मुंबईतील (Navi Mumbai) प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ओळखले जातात. एकेकाळी ठाणे (Thane) जिल्ह्यावर पकड असणाऱ्या गणेश नाईकांची स्थानिक प्रकल्पग्रस्तांसोबत शहरातील बहुभाषिक लोकांवर ही चांगली पकड होती. या बहुभाषिक लोकांवर पकड मिळवण्यासाठीच गणेश नाईकांनी कधीच प्रकल्पग्रस्तांचेच नेते म्हणून आपल्यावर शिक्का मारून घेतला नाही. म्हणूनच त्यांना 12 पगड जातींनी वसलेल्या नवी मुंबईसारख्या शहरावर अधिराज्य करता आलं. मात्र हे करत असताना त्यांचे आपले स्थानिक प्रकल्पग्रस्त मात्र त्यांच्यापासून दुरावत गेले. त्याला कारण ही तशीच असल्याचे प्रकल्पग्रस्तांकडून बोललं जातं आहे.

नवी मुंबई, पनवेल मधील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या गरजेपोटी घरांच्या निर्णयाबाबत नाईकांनी ठोस भूमिका घेतली नाही. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे दैवत समजल्या जाणाऱ्या दी बा पाटील यांचे नाव मग नवी मुंबई शहराला असो की महापालिकेच्या मुख्यालयाला असो की आता आता चर्चेचा आलेल्या नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यावरून ज्या भूमिका मांडल्या गेल्या त्यामध्ये ही नाईकांनी ठोस भूमिका मांडली नाही. किंबहुना बोलणं टाळलं.

नवी मुंबई महापालिकेत स्थानिक प्रकल्पग्रस्त साफसफाई आणि उद्यानांची कामे करीत होते त्या ठेकेदारांची कामे ही परप्रांतीयांना देण्याचा घाट घातला गेला. त्यामध्ये ही गणेश नाईकांनी ठोस भूमिका बजावली नाही. उद्यानाच्या ठेक्यावरून त्यांच्याच पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तर प्रकल्पग्रस्त ठेकेदारांकडून कामे काढण्यामागे गणेश नाईकांचाच हाथ असलयाचा अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यासर्व घटनांमुळे गणेश नाईक स्थानिक प्रकल्पग्रस्तांपासून दुरावले गेले. नाईकांनी कधीच आंदोलनाचा पवित्रा घेतला नाही किंवा घ्यायचा नव्हता. त्यांनी केलेले वाशी टोलनाका आंदोलन, मशाल मोर्चा आणि बेलापूर येथे प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाचे केलेले नेतृत्व हे पाहता नाईक कधीच आंदोलनाच्या पवित्र्यात दिसले नाही.

Mumbai CP परमवीर सिंह यांची उचलबांगडी, हा अधिकारी स्वीकारणार पदाची जबाबदारी

20 वर्ष सत्तेत असताना प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनात फारसे सहभागी झाले नाहीत. नाही ठोस निर्णय घेतला. यामुळेच प्रकल्पग्रस्तांनी एवढ्या मोठ्या आंदोलनात नाईकांना न बोलावण्याचा निर्णय घेतलाय का अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई प्रमाणेच पनवेल मध्ये ही आपलं राजकीय साम्राज्य ज्या गावांमधील प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर केलं. आणि राम ठाकूर वरून रामशेठ ठाकूर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रामशेठ ठाकूरांचा ही आंदोलकांना विसर पडला. त्याला ही कारणे फारसी गणेश नाईकांप्रमाणेच आहेत. पनवेल महापालिकेत सत्ता काबीज करायची असेल तर शहरातील लोकांना ही आपलंसं करावं लागेल. नुसतं भूमिपूत्रांच्या जाळ्यात न अडकता सर्व जाती धर्मांच्या लोकांचं नेतृत्व करण्याकडे रामशेठ ठाकुरांनी भर दिला. पण दुसरीकडे मात्र भूमिपुत्र वंचित राहिला. पनवेल सारख्या शहराचा विकास झाला मात्र पनवेल मधील गावांचा विकास झाला नाही. गावठाण विस्तार झाला नाही म्हणून 80% प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे अनधिकृत ठरली.

'त्या' मर्सिडीज गाडीवरून नाना पटोले आणि आशिष शेलारांमध्ये जुंपली

यामुळे पनवेल निवडणुकांमध्ये रामशेठ ठाकुरांना प्रकल्पग्रस्तांच्या गावांमध्ये मुसंडी मारता आली नाही. कारण, अजून ही तिथे ग्राम पंचायतींमधून शेकापचे वर्चस्व बऱ्यापैकी आहे. उरण शहर आज 50 वर्षानंतरही उपेक्षित आहे. 51 वर्षानंतर सिडकोने द्रोणागिरी नोड विकसित करायला घेतलं ही तर प्रकल्पग्रस्तांची शोकांतिका आहे. उरण मतदार संघ ज्या मतदार संघात 90% भाग ग्रामीण भाग आहे. याच ग्रामीण भागातील मतदारांनी प्रकल्पग्रस्त नेत्यांना डावलत एका गुजराती तरुण महेश बालदी यांना निवडून दिलं. याच निवडणुकीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातलं. ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर नेते मोठे झालेत मग ते सर्वच पक्षाचे नेते आहेत.

IND vs ENG : चार मॅचमध्ये फक्त एक रन काढणाऱ्या राहुल बद्दल विराटचं मोठं वक्तव्य!

या नेत्यांचे इमले च्या इमले उभे राहिले, कंपन्यांवर कंपन्या उघडल्या गेल्या, मात्र तो प्रकल्पग्रस्त आज ही आपल्या साध्या गरजांसाठी पुन्हा झेंडा आणि मागण्यांचे फलक घेऊन उभा राहिलेला दिसतोय. हीच या स्थानिक प्रकल्पग्रस्तांची शोकांतिका म्हणावी लागेल. आणि म्हणूनच 400 गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कोणत्याही नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना या आंदलनाचे निमंत्रण दिले नाही. आपणही प्रकल्पग्रस्त आहात. याची जाणीव ठेवून सर्वसामान्य  प्रकल्पग्रस्त म्हणून आंदोलनात सामील व्हा.. अशी सांगण्याची वेळ प्रकल्पग्रस्तांवर आली. कारण आता पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त पेटून उठला आहेे.

First published:

Tags: Ganesh naik, India, Maharashtra, Mumbai, गणेश नाईक, नवी मुंबई