• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • लॅाकडाऊनचे बळी, नवी मुंबईत 2 सख्या बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या

लॅाकडाऊनचे बळी, नवी मुंबईत 2 सख्या बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या

ऐरोली 10 मधील सागरदर्शन सोसायटीमध्ये दोन्ही बहिणी राहत होत्या.

 • Share this:
  नवी मुंबई, 02 ॲागस्ट : लॅाकडाऊनमुळे ( lockdown) अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तर अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या काही जणांनी जीवनयात्रा (suicides) संपवली. नवी मुंबईत (navi mumbai) लॅाकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ऐरोली भागात ही घटना घडली. लक्ष्मी पंत्री (वय 33) आणि स्नेहा पंत्री (वय 26) असं या दोन्ही सख्या बहिणीची नाव आहे. ऐरोलीमध्ये सेक्टर 10 मधील सागरदर्शन सोसायटीमध्ये दोन्ही बहिणी राहत होत्या. दोघ्या बहिणी घरीच शिकवणी वर्ग घेत होत्या. आर्थिक चणचण भासू लागल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांकडून उधारीने पैसे घेतले होते. सतत पैशांची चणचण भासू लागल्यामुळे दोघ्या जणी नैराश्यग्रस्त झाल्या होत्या. त्यातून राहत्यात घरात गळफास लावून दोघींनी आत्महत्या केली. एका बहिणीने हॉल आणि दुसऱ्या बहिणीने बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला. दोघी बहिणी घराच्या बाहेर न दिसल्यामुळे शेजारच्यांना संशय आला. पोलिसांना बोलावले असता दार तोडून आत गेल्यावर दोघींनी आत्महत्या केल्याचं आढळून आलं. या प्रकरणाचा अधिक तपास ऐरोली पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाने केला बापाचा खून दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बोरी खुर्द येथे शुल्क कारणावरून एका अल्पवयीन मुलाने जन्मदात्या पित्याची हत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंजाजी हर्सुजी दीपके असं मृत व्यक्तीचे नाव आहे. मुलीला परत माहेरी पाठवण्यावरून घरात वाद झाला होता. या वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बोरी खुर्द येथील पुंजाजी हर्सुजी दीपके यांच्या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. सासरी गेल्यानंतर काही दिवस मुलीचा संसार सुखाने चालला पण नंतर घरगुती वाद वाढले. सासरच्या लोकांशी वारंवार वाद होत असल्याने ती माहेरी वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. मात्र आता बऱ्याच दिवसांपासून मुलगी घरी असल्याने वडील पुंजाजी यांनी मुलीला सासरी जाण्यास सांगितले. यावरून मुलगा आणि वडील पुंजाजी यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मुलाने रागाच्याभरात वडिलांवर लाकडी काठीने डोक्यावर व अंगावर वार केले. यात वडील पुंजाजी दिपके गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान पुंजाजी दिपके यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार पुसद शहर पोलीस स्टेशनला दिली असता मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बालकास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
  Published by:sachin Salve
  First published: