Home /News /maharashtra /

मित्रांकडून तरूणाचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न, VIDEO सोशल मीडियात व्हायरल

मित्रांकडून तरूणाचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न, VIDEO सोशल मीडियात व्हायरल

नवी मुंबईतील दिघा येथे धुळवडच्या दिवसाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी मुंबई, 11 मार्च: नवी मुंबईतील दिघा येथे धुळवडच्या दिवसाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या एकाचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न केला करण्यात आला. एवढेच नाही तर या प्रकाराचं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण करून व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित तरुणाच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या पीडित तरुणावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आकाश काळे आणि नितेश खारकर असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हेही वाचा...मुंबईत व्यापारी पतीने तीन मित्रांना दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची मुभा यातील फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र असून त्यांच्या अन्य मित्राच्या घरी कोणी नसल्याने धुळवडला घरी दारू पिण्यास बसले होते. दारू अति झाल्यावर फिर्यादी तिथेच झोपला. मात्र त्याने झोपेत लघुशंका केल्याचा राग आल्याने आरोपी मित्रांनी त्याची पँट खाली करून गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात गुप्तांगाला इजा पोहोचली आहे. आरोपींनी या प्रकारालाचा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण करून व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल केला. हेही वाचा...बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत होती मुलगी, आईला येताना पाहाताच तिनं केलं असं.. सकाळी नशेचा अंमल कमी झाल्यावर पीडित तरुणाच्या ही बाब लक्षात आली. आदल्यादिवशी काय झाले हे कळल्यावर त्याने तडक रबाळे एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Crime news, Maharashtra crime news, Mumbai police, Navi mumbai crime, Woman cut off the boy penis

पुढील बातम्या