मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपला लागली 'मेगा गळती', आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीत दाखल

भाजपला लागली 'मेगा गळती', आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीत दाखल

राष्ट्रवादीने आज पुन्हा एकदा आमदार गणेश नाईकांच्या गडाला जोरदार हादरा दिला आहे.

राष्ट्रवादीने आज पुन्हा एकदा आमदार गणेश नाईकांच्या गडाला जोरदार हादरा दिला आहे.

राष्ट्रवादीने आज पुन्हा एकदा आमदार गणेश नाईकांच्या गडाला जोरदार हादरा दिला आहे.

नवी मुंबई, 25 जानेवारी :  नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Navi Mumbai Municipal Election) तोंडावर भाजपला चांगलीच गळती लागली आहे. भाजपच्या आणखी एका नगरसेवकाने पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 14 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादीने आज पुन्हा एकदा आमदार गणेश नाईकांच्या गडाला जोरदार हादरा दिला आहे.  भाजप नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तनुजा मढवी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. Accenture ला मागे टाकत, TCS ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी याआधीही 5 जानेवारी रोजी  भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड  यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.  शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.  उच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप नगरसेविकेनं भाजपला रामराम ठोकला. आतापर्यंत 14 नगरसेवकांनी  भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आणखी एका अभिनेत्रीने केली आत्महत्या! सुशांतसारखं पंख्याला लटकून स्वतःला संपवलं विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते.  नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेनं धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्के पे धक्का दिला आहे.
First published:

Tags: Sharad pawar

पुढील बातम्या