Home /News /maharashtra /

Navi Mumbai: नवी मुंबईत सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO VIRAL

Navi Mumbai: नवी मुंबईत सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO VIRAL

नवी मुंबईत सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO VIRAL

नवी मुंबईत सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO VIRAL

Live Video of fight between two groups in Navi Mumbai society election: सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात ही घटना घडली आहे.

नवी मुंबई, 5 फेब्रुवारी: येत्या काळात राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका (Municipal Corporation Election) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीचे परिणाम आता स्थानिक सोसायटीच्या निवडणुकांतही (Society election) दिसू लागले आहेत. त्याचाच प्रत्यय नवी मुंबईतील घणसोली (Ghansoli area of Navi Mumbai) परिसरात दिसून आला. येथील एका सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी (fight between two group) झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. (Live video of fight between two group in Ghansoli area of Navi Mumbai) नवी मुंबईतील घणसोली परिसरात ही घटना घडली आहे. घणसोलीतील माऊली कृपा या सोसायटीमध्ये संचालकपदाची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत परिवर्तन आणि उन्नत्ती पॅनल आमने सामने आहेत. याच सोसायटीत माघी गणेशोत्सवाचेही आयोजन केले आहे. सोसायटीतील निवडणुकीमुळे तणावाचे वातावरण आहे. दोन्ही गटांत झालेल्या बाचाबाचीनंतर हाणामारी झाली. वाचा : मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत आढळला मृतदेह सोसायटीमध्ये बाहेरून आलेल्या तरुणांनी सोसायटीमधील दिलीप चिकणे यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही मारहाण परिवर्तन पॅनलचे सौरभ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप  उन्नत्ती पॅनलने केला आहे. याबाबत पोलिसांनी मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीची ही निवडणूक जरी असली तरी येत्या काळात होणाऱ्या नवी मुंबई मनपाच्या निवडणुका आणि त्यासोबतच या परिसरातील इमारतींचं पुनर्वसन यामुळे निवडणुकीला फार महत्त्व आलं आहे. या परिसरात माथाडी कामगारांचे जवळपास 250 ते 300 घरे आहेत. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले आहेत. वाचा : विमान कोसळलं, विमानातल्या सातही जणांचा मृत्यू घरांच्या पुनर्विकासाचे काम आता सुरू झालं आहे. पुनर्विकासाचं काम हातून जाऊ नये यासाठी राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. परिवर्तन पॅनल हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मानला जातो तर उन्नत्ती पॅनल हा भाजपचा असल्याचं मानला जातो. याच निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन पॅनलकडून शुक्रवारी रात्री जेवण ठेवण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही गटांत सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्यानंतर या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, जमाव एका इसमाला बेदम मारहाण करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv footage, Crime, Elections, Live video viral, Maharashtra, Muncipal corporation

पुढील बातम्या