धक्कादायक! गाडी दिली नाही म्हणून मुलानं शाळेत स्वत:ला पेटवलं

धक्कादायक! गाडी दिली नाही म्हणून मुलानं शाळेत स्वत:ला पेटवलं

क्षुल्लाक कारणातून युवकानं उचललं टोकाचं पाऊल, युवकावर रुग्णालयात उपचार सुरू

  • Share this:

विनय म्हात्रे (प्रतिनिधी) नवी मुंबई, 15 नोव्हेंबर: पनवेलमध्ये हट्टानं तर बुलडाण्यात नाईलाजानं आयुष्य संपवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलमधील घटनेत युवक गंभीर जखमी असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कळंबोली इथल्या सुधागड कनिष्ठ महाविद्यालयात एका विद्यार्थ्यानं स्वत: ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कळंबोली इथे घडली. विद्यालयाच्या बाथरुममध्ये त्याने सकाळी स्वत:ला पेटवून घेतलं.

धक्कादायक प्रकार म्हणजे वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर एरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.

दुसरीकडे ओल्या दुष्काळामुळे बुलडाण्यातील खामगाव तालुक्यात शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं आहे. अतिवृष्टीने झालेल्या पिकाच्या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्यानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फक्त आमदार आणि नेत्यांकडून पिकांच्या नुकसानाची पाहाणी होत आहे. मात्र अद्यापही ना पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले ना मदतीचे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनं आपलं जीवन संपवलं. बोरी अडगाव येथील शेतकरी गणेश विठ्ठल मेतकर (वय५० वर्षे) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. 4 एकरावरील पीकाचं अतोनात नुकसान झाल्यानं त्यांनी हे पाऊल उचललं आहे. तर राज्यातील शेतकरी सरकारकडे मदतीसाठी वारंवार मागणी करत आहेत. मात्र शेतकऱ्य़ांना मतद कधी मिळणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे.

कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 02:04 PM IST

ताज्या बातम्या