पेट्रोल, डिझेल दरवाढीचा असाही परिणाम, डाळींच्या किमती वाढल्या!

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा असाही परिणाम, डाळींच्या किमती वाढल्या!

डिझेल पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 14 मार्च : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (APMC) धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव वाढू लागले आहे. डिझेल पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आवक घटल्याने पाच ते दहा रुपयांनी डाळीचे भाव (Pulses Prices) वाढले आहे.

दोन महिन्यांपूर्वी असलेल्या उडीद डाळीच्या भावात वाढ होऊन ही डाळ 90 ते 115 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मूगडाळ 95 ते 115 किलो दराने विकली जात आहे. तर हरभरा डाळीमध्ये आवक वाढल्यामुळे घट झाली असून 57 ते 63 रुपये किलोवर पोहोचली आहे. मसुर डाळ 60 ते 63 रुपये किलो झाली असून त्यामध्ये घट झाली आहे. तुरडाळीची आवक वाढल्यामुळे घट झाली असून 78 ते 98 रुपये किलो झाली आहे.

हेही वाचा - महाशिवरात्रीलाच झाला घात; साबुदाणा घशात अडकल्याचं झालं निमित्त अन् 11 वर्षांच्या मुलाने गमावला जीवदुसरीकडे, धान्याच्या भावामध्ये मात्र घसरण होताना दिसत आहे. देशातील महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आदी राज्यातून येणारा गहू आणि तांदळाचा दर्जा घसरल्याने घाऊक बाजारात गहू आणि तांदळाला उठाव कमी आहे. गहू, तांदूळ आणि बाजरीचे भाव घसले आहेत.

मागील वर्षी विकला जाणाऱ्या धान्यामध्ये यावर्षी किलोमागे 4 ते 6 रुपयांनी घसरण झाली आहे. नक्कीच मागील वर्षी कोरोनाचा काळ असल्याने धान्याच्या उत्पादनावर आणि वितरणावर परिणाम झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत धान्यांचे भाव घसरताना दिसत आहेत. मात्र अवकाळी पावसाचा फटकाही धान्य उत्पादनाला बसला आहे.

दमट हवामानामुळे धान्यांच्या दर्जावर परिणाम झाला आहे. म्हणून आज धान्याचे भाव घसरताना दिसत असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 14, 2021, 7:31 AM IST

ताज्या बातम्या