Home /News /maharashtra /

नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद चिघळला; मुंबईहून पुणे-कोकणात जाताय? मग ही बातमी वाचाच

नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद चिघळला; मुंबईहून पुणे-कोकणात जाताय? मग ही बातमी वाचाच

Navi Mumbai Airport naming issue: नवी मुंबईतील विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा आथा आणखी चिघळल्याचं दिसत आहे.

नवी मुंबई, 23 जून: नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) देण्यात येणाऱ्या नावावरुन राजकीय वातावरण तापले आहे. त्यासोबतच स्थानिक नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त उद्या म्हणजेच 24 जून रोजी सिडकोला (CIDCO) घेराव घालणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. यामुळे नवी मुंबईला (Navi Mumbai) पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे. (Navi Mumbai Airport naming controversy) VIDEO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची रचना कमळाप्रमाणे; पाहा कसं असेल हे Airport नवी मुंबईच्या वाहतुकीत बदल उद्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून नवी मुंबई पोलिसांनी सायन-पनवेल महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे किंवा कोकणाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. आपण मुंबईकडून पुणे किंवा कोकणाकडे जाणार असाल तर मुंबईतून वाशीमार्गे महापे जंक्शनला जाऊन तिथून शिळफाटा मार्गे कळंबोली जंक्शनला पोहचता येईल. नंतर पुढे पुणे आणि कोकणाकडे जाता येईल. ठाणे किंवा मुलुंडकडून पुणे आणि कोकणाकडे जाणार असाल तर आपणास महापे जंक्शन आणि शिळफाट्यामार्गे जाता येणार आहे.
बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं असतं - राज ठाकरे नवी मुंबईत येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांची वाहतूक पुर्णत: बंदी तसेच सायन पनवेल मार्गावरुन सीबीडी मार्गे पुण्याकडे तसेच मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या दोन्ही मार्गांवर उरणफाटा ते खारघर दरम्यान तसेच सीबीडी सर्कलकडे येणारे रस्ते 24 जून 2021 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रवेश बंधी घोषित करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांकडून महामोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकप्लग्रस्तांना नोटीसही बजावली आहे. आम्ही कोविड नियमांचे पालन करुनच आंदोलन करणार असल्याचं कृती समितीच्या सदस्यांनी म्हटलं आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Airport

पुढील बातम्या