मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /LIVE : नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी एल्गार, 1 लाख आंदोलक सिडको कार्यालयावर धडकणार!

LIVE : नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी एल्गार, 1 लाख आंदोलक सिडको कार्यालयावर धडकणार!रायगड, ठाणे आणि पालघर मधून तब्बल 1 लाख आंदोलन कर्ते नवी मुंबईत येणार आहेत.

रायगड, ठाणे आणि पालघर मधून तब्बल 1 लाख आंदोलन कर्ते नवी मुंबईत येणार आहेत.

रायगड, ठाणे आणि पालघर मधून तब्बल 1 लाख आंदोलन कर्ते नवी मुंबईत येणार आहेत.

नवी मुंबई, 24 जून :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (navi mumbai international airport)  नामांतराचा मुद्दा आता चिघळला आहे. दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्थ आक्रमक झाले असून आज आपला आवाज राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी सिडकोला (cidco) घेराव घालण्यात येणार आहे.  या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी पुढे येत होती. त्यामुळे आज आंदोलकांनी सिडको कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलनाची तयारी केली आहे. नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली,  रायगड सोबतच ठाणे आणि पालघर मधून आंदोलन करण्यात येणार आहे.

नवी मुंबई पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्ग महामारीचे कारण पुढे करत पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारलीय असली तरी प्रकल्पग्रस्थानीं आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

HBD: अभिनेताच नव्हे तर गायकही आहे अंकुश; पाहा अभिनेत्याच्या काही खास गोष्टी

रायगड, ठाणे आणि पालघर मधून तब्बल 1 लाख आंदोलन कर्ते नवी मुंबईत येणार आहेत. या सर्व आंदोलन कर्त्यांना नवी मुंबईतील पामबीच मार्गावर अडवण्यात येणार आहे.

तिन्ही  जिल्ह्यातील गावागावांमधून हे आंदोलन पेटल्याने नवी मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.  मुंबईकडून पुणे आणि कोकणाकडे जाणारी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे.

WTC Final मध्ये पराभव, तरी टीम इंडियाचा खेळाडू पोहोचला पहिल्या क्रमांकावर

नवी मुंबईत येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांची वाहतूक पुर्णत: बंदी तसेच सायन पनवेल मार्गावरुन सीबीडी मार्गे पुण्याकडे तसेच मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या दोन्ही मार्गांवर उरणफाटा ते खारघर दरम्यान तसेच सीबीडी सर्कलकडे येणारे रस्ते 24 जून 2021 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रवेश बंधी घोषित करण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांकडून महामोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकप्लग्रस्तांना नोटीसही बजावली आहे. आम्ही कोविड नियमांचे पालन करुनच आंदोलन करणार असल्याचं कृती समितीच्या सदस्यांनी म्हटलं आहे.

First published: