Home /News /maharashtra /

भयानक! लहान मुलानं लोखंडी शिडीला स्पर्श केला, त्यानंतर घडला हादरवणारा अपघात

भयानक! लहान मुलानं लोखंडी शिडीला स्पर्श केला, त्यानंतर घडला हादरवणारा अपघात

Navi Mumbai News: अनेक अपघात केवळ लहानशा मानवी निष्काळजीपणामुळे घडत असतात. ऐरोलीतील घटना हेच सांगते.

    नवी मुंबई, 23 फेब्रुवारी : विजेच्या तारांमुळे अनेकदा दुर्दैवी अपघात (accident due to electricity) झाल्याचे आपण पाहतो. अशीच एक घटना नवी मुंबईत (Navi Mumbai) घडली आहे. सोमवारी सकाळी ऐरोलीत (Airoli) ही घटना घडली. इथं एका 12 वर्षांच्या मुलाचा (12 year old by) विद्यूतप्रवाहाला हात लागल्यानं मृत्यू झाला(died due to electricity contact). हा मुलगा रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या एका लोखंडी शिडीच्या (iron ladder)संपर्कात आला होता. ही लोखंडी शिडी एका विजेच्या तारेच्या संपर्कात आली होती. या तारेत खूप शक्तिशाली वीजप्रवाह वाहत होता. हा विद्युतप्रवाह किती हाय व्होल्टेज (high voltage) होता याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो, की काही सेकंदातच मुलाच्या शरीरात आग लागली (body caught fire) आणि त्याचा तिथंच मृत्यू झाला. हेही वाचा पोहरादेवीची गर्दी पाहून मुख्यमंत्री संतापले; म्हणाले... रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे म्हणाले, की मुलाची ओळख अजून पटू शकली नाही. सध्या असं सांगितलं जातं आहे, की तो फुटपाथवरच राहत होता. ही घटना सोमवारी सकाळी ऐरोली सेक्टर 7 मध्ये शिव शंकर प्लाझा 2 मध्ये दुकान क्रमांक 7 च्या समोर झाली. सकाळी 8.52 वाजता ही घटना घडली. ही घटना तिथं लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी ऍक्सीडेंटल डेथ रिपोर्ट नोंदवून घेतला आहे. हेही वाचा ही कसली अग्निपरीक्षा! पत्नीला उकळत्या तेलात हात घालून काढायला लावलं नाणं गावडे म्हणाले, की मृत मुलाच्या कुटुंबाबाबत अजून काही कळालेलं नाही. आम्ही त्याचा तपास करतो आहोत. याचाही तपास केला जातो आहे, की लोखंडाची इतकी मोठी शिडी तिथं का ठेवली गेली होती. यातून कुणाची चूक समोर आली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Electricity, Fire

    पुढील बातम्या