उस्मानाबादमध्ये नाट्यसंमेलनाची तयारी जोरात

उस्मानाबादमध्ये नाट्यसंमेलनाची तयारी जोरात

97 वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन यंदा उस्मानाबादला होणार आहे. 22 तारखेपासून त्याची सुरुवात होणार आहे.

  • Share this:

13 एप्रिल : 97 वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन यंदा उस्मानाबादला होणार आहे. 22 तारखेपासून त्याची सुरुवात होणार आहे. सतत 3 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर यंदा नाट्यसंमेलनाचं यजमानपद उस्मानाबादला मिळालं, त्यामुळे उस्मानाबादकरांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय.

माझं गाव माझं संमेलन या शीर्षकाखाली विविध उपक्रम इथं राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून उस्मानाबादकरांनी संमेलनाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली. ज्येष्ठ नागरिकांपासून महिला, मुलं आणि राजकीय पुढाऱ्यांपर्यंत सर्वांनी यात हिरिरीनं सहभाग घेतला. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संख्येनं यात सहभाग घेतल्याचं चित्र इथं दिसतंय.

First published: April 13, 2017, 9:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading