भाजपला मदत करणाऱ्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादीचा दणका

भाजपला मदत करणाऱ्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादीचा दणका

शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे

  • Share this:

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 12 जानेवारी : महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादीने जोरदार दणका दिला आहे. या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. तसंच शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटवण्यात आल्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

अहमदनगरमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धोबीपछाड महापौरपद काबीज केले होते. शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपने ही महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.

राष्ट्रवादी नगरसेवकांच्या या पाठिंब्यामुळे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 'राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश नव्हते. ज्या नगरसेवकांनी भाजपला मदत केली, त्यांच्यावर कारवाई करू, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं.

विशेष म्हणजे, पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली. या प्रकरणी जयंत पाटलांनी आधीच नगरसेवकांना नोटीस बजावली होती. अखेर या 18 नगरसेवकांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.त्याचबरोबर शहराध्यक्षांनाही बाहेरचा रस्त्या दाखवण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या या कारवाईनंतर आता नगरमध्ये पुन्हा एकदा सत्तेचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

==============================================

First published: January 12, 2019, 4:30 PM IST
Tags: BJPcongres

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading