मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकार जाताच जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, मानवाधिकार आयोगाची नोटीस, आाता पुढे काय?

सरकार जाताच जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, मानवाधिकार आयोगाची नोटीस, आाता पुढे काय?

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.

मुंबई, 11 ऑगस्ट : महाविकास आघाडीचं सरकार कोसळून राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाचे आणि भाजपचे एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. नवं सरकार स्थापन होवून आता एक महिन्याचा काळ उलटला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार कोसळून आणि नवं सरकार स्थापन होवून अवघे 50 दिवस होत नाही तेवढ्यात गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीमुळे आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवली आहे. अनंत करमुसे प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. मानधिकार आयोगाने आव्हाडांना हजर राहून उत्तर देण्यास सांगितलं आहे. जितेंद्र आव्हाड याप्रकरणी काय प्रतिक्रिया मांडतात, त्यानंतर मानवाधिकार आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरण नेमकं काय? जितेंद्र आव्हाड मंत्री असताना संबंधित प्रकरण समोर आलं होतं. ठाण्यात राहणाऱ्या अनंत करमुसे नावाच्या एका इंजिनिअर तरुणाने 5 एप्रिल 2020 रोजी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षा रक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्याचं अपहरण करत आव्हाडांच्या घरी नेल्याचा आरोप करण्यात आला होता. सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांना आव्हांडाच्या निवासस्थानी नेलं होतं. त्यावेळी आव्हाडही घरी होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना करमुसे यांना बेदम मारहाण केली होती, असा आरोप करण्यात आला आहे. (महाविकासआघाडीमध्ये कुरबुरी सुरूच, शिवसेनेवर काँग्रेसनंतर राष्ट्रवादीही नाराज) संबंधित घटनेप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना देखील अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांना 10 हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर केला होता. संबंधित प्रकरणावरुन हायकोर्टातही बरेच दिवस सुनावणी सुरु होती. या प्रकरणी आता राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या