राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्लचं भावासह अपहरण

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्लचं भावासह अपहरण

१८ मे रोजी सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कालावधित निलेश भिल्ल आणि त्याचा लहान भाऊ गणपत रेवाराम भिल्ल वय ७ वर्ष या दोघांचं कोणीतरी अपहरण केलं

  • Share this:

20 मे : राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्ल आणि त्याच्या भावासह अपहरण करण्यात आल्य़ाची बाब उघड झालीये.

मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी हे निलेश भिल्लचं गाव आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्लसह त्याच्या लहान भावाचं अपहरण झाल्याची फिर्याद त्यांच्या आईनं पोलिसात दिलीय.

काल ही फिर्याद दाखल करण्यात आलीय. १८ मे रोजी सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कालावधित निलेश भिल्ल वय १२ वर्ष आणि त्याचा लहान भाऊ गणपत रेवाराम भिल्ल वय ७ वर्ष या दोघांचं कोणीतरी अपहरण केलं असं या फिर्यादी म्हटलंय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक वंदना सोनुने या करत आहेत.

निलेशने वाजवला होता एकाचा जीव

मुक्ताईनगरमध्ये निलेशने एका 11 वर्षीय मुलाचे प्राण वाचवले होते. निलेश देवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेला होते तेव्हा नदीमध्ये 11 वर्षीय मुलाचा पाय घसरून नदीत पडला. तो पाण्यात बुडत असल्याचं पाहून निलेशने नदीत उडी घेतली आणि या मुलाचा जीव वाचवला. या धाडसासाठी त्याला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देण्यात आला होता.

First published: May 20, 2017, 1:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading