मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मालेगावात तरुणांमध्ये जोरदार राडा; रागाने बघितल्याचा आला राग, संतापाच्या भरात तरुणाच्या हाताचा पंजाच छाटला

मालेगावात तरुणांमध्ये जोरदार राडा; रागाने बघितल्याचा आला राग, संतापाच्या भरात तरुणाच्या हाताचा पंजाच छाटला

रागाने बघितल्याचा आला राग, संतापाच्या भरात तरुणाच्या हाताचा पंजाच छाटला

रागाने बघितल्याचा आला राग, संतापाच्या भरात तरुणाच्या हाताचा पंजाच छाटला

Malegaon Crime News: मालेगावातून एक धक्कादायक आणि खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. शुल्लक वादातून एका तरुणाच्या हाताचा पंजाच छाटल्याचा प्रकार मालेगावात घडला आहे.

मालेगाव, 23 मार्च : रागाने बघतो या किरकोळ कारणावरून एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणाने दुसऱ्या तरुणावर हल्ला (attack on youth) केला आहे. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात पीडीत तरुणाच्या उजव्या हाताचा पंजा छाटल्याची खळबळजनक घटना मालेगावच्या मेहवी नगर (Mehavi Nagar Malegaon) भागात घडली आहे. ज्याचा पंजा तोडण्यात आला त्याचे नाव शेख फैजुल रहेमान असून तो यंत्रमाग कारखान्यात काम करणारा मजूर आहे.

हल्ला केल्यानंतर आरोपी इब्राहिम फरार झाला आहे. जखमी झालेल्या फैजुलला खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या हातापासून तोडण्यात आलेला पंजा जोडण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेत फैजुलला मात्र कायमचे अपंगत्व आले आहे.

वाचा : लेडी डॉनच्या बहिणीवर प्रेम करणं तरुणाला पडलं महागात; LOVE STORY चा झाला वेदनादायी शेवट

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून फरार झालेला आरोपी इब्राहिमचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने फिर्यादी आपल्याकडे रागाने का पाहतोस अशी विचारणा केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांत जोरदार राडा झाला.

वाचा : गोव्यातून कुरिअर बॉय म्हणून यायचे अन् घर साफ करुन जायचे; असे झाले गजाआड

फिर्यादी हा त्याच्या राहत्या घरासमोर मोटरसायकल धुवत असतांना आरोपीने तेथे आला. यावेळी आरोपीने फिर्यादीस म्हाणाला की, तु माझ्याकडे नेहमी रागाने का बघतो. या कारणावरुन कुरापत काढुन फिर्यादीस वाईट साईट शिवीगाळ करु लागला. तेव्हा फिर्यादीने त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी आरोपीने फैजुल याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

वाचा : मुंबई : सरपंच होण्याआधी झाला चोर; मुख्यमंत्र्यासह बिल्डरांच्या घरात काम केलं अन्

यानंतर आरोपीने आपल्या हातातील काहीतरी धारदार हत्याराने फिर्यादीचे उजव्या हाताच्या पंजावर मारला. या हल्ल्यात पीडित फैजुल याच्या हाताचा पंजा मनगटापासून पूर्णपणे वेगळा करून गंभीर दुखापत केली. तसेच जिवे मारण्याचा दम दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तर पीडित फैजुल याच्यावर इकरा हॉस्पीटल मालेगाव येथे औषधोपचार सुरू आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Malegaon, Nashik