Home /News /maharashtra /

गावातील वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरला तरुण, इगतपुरीतील VIDEO

गावातील वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरला तरुण, इगतपुरीतील VIDEO

सलग होत असलेल्या पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊन काही गावं अंधारात बुडाली होती. ज्या खांबावर बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता तो खांब पुराच्या पाण्यात बुडालेला होता

नाशिक 25 जुलै : शहर असो किंवा गावखेडे वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात अनेकदा वादळ-वारे किंवा पुरपरिस्थितीसारख्या कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होतो. मात्र अनेक वेळा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करतात आणि वेळेत दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळित करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक घटना इगतपुरीच्या रायम्बे येथे घडली. Beed : तंत्रज्ञानाची जोड देऊन ‘हायटेक शेती’; पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर सलग होत असलेल्या पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊन काही गावं अंधारात बुडाली होती. ज्या खांबावर बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता तो खांब पुराच्या पाण्यात बुडालेला होता. अखेर अमोल जागले या कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. हा कर्मचारी पुराच्या पाण्यात पोहत गेला आणि विद्युत पोलवर चढून त्याने खंडित असलेला वीज पुरवठा सुरू केला. जंगलात कामाला गेला अन् झाडाखाली झोपला, कुटुंबीय शोधत पोहोचले तर बसला धक्का पुराच्या पाण्यात पोहत जाणाऱ्या अमोलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. ग्रामस्थांनी देखील या प्रकाशदूताचा सत्कार करून त्याचे आभार मानले आहेत. दरम्यान या तरुणाचा हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून तो या खांबापर्यंत जातो आणि खांबावर चढून वीजपुरवठा सुरळित केला.
Published by:Kiran Pharate
First published:

पुढील बातम्या