मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू; बाळाच्या आईची पतीविरोधातच पोलिसांत धाव

मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू; बाळाच्या आईची पतीविरोधातच पोलिसांत धाव

वडिलांच्या दुर्लक्षामुळे 18 महिने वय असलेल्या बालकाचा मृत्यू झाला. छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने या बालकाचा मृत्यू झाला आहे.

वडिलांच्या दुर्लक्षामुळे 18 महिने वय असलेल्या बालकाचा मृत्यू झाला. छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने या बालकाचा मृत्यू झाला आहे.

वडिलांच्या दुर्लक्षामुळे 18 महिने वय असलेल्या बालकाचा मृत्यू झाला. छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने या बालकाचा मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Kiran Pharate

नाशिक 26 नोव्हेंबर : अतिशय छोट्या चुकीमुळे किंवा थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे लहान मुलांचा जीव गेल्याच्या अनेक घटना समोर येत राहतात. आज नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात वडिलांच्या दुर्लक्षामुळे 18 महिने वय असलेल्या बालकाचा मृत्यू झाला. छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने या बालकाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर बालकाच्या आईने आपल्या पतिविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवांश संकेत बोराडे असं18 महिन्याच्या बालकाचं नाव असून त्याचा मृत्यू छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने झाला आहे. या घटनेनंतर बालकाच्या आईने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

Thane : आईची नजर चुकली अन् अनर्थ घडला, चिमुकल्याच्या घशात मासा अडकून मृत्यू

तक्रारदार महिलेनं म्हटलं की कौटुंबिक मतभेदामुळे संशयिताने हे कृत्य केलं आहे. पित्याने18 महिन्याचे घरात बाळ असल्याचं माहिती असताना देखील छोटा मॅजिक क्रेझी बॉल आणला होता. तसंच संशयिताला मेडिकल फिल्डची आणि छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने बालकाचा मृत्यू होऊ शकतो, याबाबत माहिती होती. तरीदेखील हे कृत्य केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

मासा घशात अडकून चिमुकल्याचा मृत्यू -

दरम्यान, नुकतीच अशीच आणखी एक घटना अंबरनाथमधील उलन चाळ परिसरातून समोर आली होती. या घटनेत घशात मासा अडकून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहाबाज अन्सारी असं या चिमुकल्याचं नाव आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमार शहाबाज हा घरात एकटाच खेळत होता. शहाबाजच्या आईने घरामध्ये खाण्यासाठी छोट्या आकाराचे मासे आणले होते, हे जिवंत मासे एका बाजूला घरामध्ये जमिनीवर ठेवले होते. मात्र आईची नजर चुकवत शहाबाज रांगत त्या माशांपर्यंत पोहोचला आणि त्याने एक जिवंत मासा तोंडात घातला. हा मासा शहाबाजच्या घशात जाऊन अडकला, त्यामुळे शहाबाज अस्वस्थ झाला. त्यानंतर आईने आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारसाठी दाखल केलं. मात्र श्वास गुदमरून त्याचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.

First published:

Tags: Nashik, Shocking news