मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

माय-लेकाच्या भांडणात मध्यस्थी करणं महिलेच्या जीवावर बेतलं; नाशिकमधील खळबळजनक घटना

माय-लेकाच्या भांडणात मध्यस्थी करणं महिलेच्या जीवावर बेतलं; नाशिकमधील खळबळजनक घटना

वाद सोडवणं या महिलेच्या जीवावर बेतलं. इगतपुरीमध्ये वाद सोडवण्यासाठी गेलेल्या या महिलेचाच खून करण्यात आला. खुनाच्या घटनेनंतर आरोप फरार झाला आहे (Nashik Murder News)

  • Published by:  Kiran Pharate
नाशिक 20 ऑगस्ट : आपल्या आसपास कोणाचं भांडणं सुरू असेल तर माणुसकीच्या नात्याने आपण यात मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, काहीवेळा ही गोष्ट जीवावरही बेतू शकते. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नाशिकच्या इगतपुरीमधून समोर आली आहे. ज्यात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. वडिलांचं छत्र हरपलं आईनं वाढवलं, पण प्रेमात अडचण झाली म्हणून मुलीनं संपवलं वाद सोडवणं या महिलेच्या जीवावर बेतलं. इगतपुरीमध्ये वाद सोडवण्यासाठी गेलेल्या या महिलेचाच खून करण्यात आला. खुनाच्या घटनेनंतर आरोप फरार झाला आहे. जकिया शेख असं घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुलाचा आपल्या आईसोबत वाद सुरू होता. आई आणि मुलामध्ये सुरू असलेला वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जकिया शेख यांनी मध्यमस्थी करण्याचा प्रयत्न केला. प्रेमासाठी आईचाच गळा घोटला; लेकीच्या कृत्याने गडचिरोलीत खळबळ या घटनेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न जकिया यांच्या जीवावर बेतला. या घटनेत जकिया यांचीच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेत सात आरोपी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
First published:

Tags: Crime news, Murder

पुढील बातम्या