मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सासूच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला अन् 4 लाखांचे दागिने झाले गायब, नाशकातील विचित्र घटना

सासूच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला अन् 4 लाखांचे दागिने झाले गायब, नाशकातील विचित्र घटना

Crime in Nashik: औरंगाबादवरून नाशिक येथील पंचवटी याठिकाणी लग्नसोहळ्यासाठी आलेल्या एका महिलेसोबत विचित्र घटना घडली आहे. अवघ्या काही सेकंदात चोरट्याने चार लाखांचा चुना (theft 4 lakh worth ornaments) लावला आहे.

पंचवटी, 10 डिसेंबर: औरंगाबादवरून नाशिक (Nashik) येथील पंचवटी याठिकाणी लग्नसोहळ्यासाठी आलेल्या एका महिलेसोबत विचित्र घटना घडली आहे. संबंधित महिला विवाह हॉलमध्ये पोहोचल्यानंतर, अवघ्या काही सेकंदात त्यांची पर्स चोरट्याने लंपास केली आहे. त्यांच्या पर्समध्ये जवळपास 4 लाख रुपये किमतीचे दागिने ( theft 4 lakh worth ornaments) होते. काही सेकंदात चोरी झाल्याने विवाहस्थळी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला विवाह हॉलमध्ये पोहोचल्या असता, त्यांचा जावई समोरून येत होता. मावस सासूला पाहून जावई देखील त्यांच्या दिशेनं आला. त्याने सासूबाईंच्या पाया पडण्यासाठी त्यांची पर्स बाजूच्या एका खर्चीवर उचलून ठेवली. त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दागिन्यांची पर्स गायब केली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला आहे.

हेही वाचा-पुण्यानंतर शिर्डीतही गोळीबाराचा थरार; भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या

या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील इटखेडा पैठण रोड येथील राहिवासी असणाऱ्या मनीषा उमेश सोनवणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून भामट्याचा शोध घेतला जात आहे. फिर्यादी सोनवणे या औरंगाबाद येथून लग्न सोहळ्यासाठी पंचवटी येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी लग्नात परिधान करण्यासाठी चार लाख रुपये किमतीचे दहा तोळं सोनं आणलं होतं. त्यांनी सर्व सोन एका पर्समध्ये ठेवलं होतं. पण चोरट्यानं भरदिवसा मंगल कार्यालयातून ही पर्स लांबवली आहे.

हेही वाचा-बड्या राजकीय नेत्याकडून तरुणीचं आयुष्य उद्धवस्त, लग्नानंतरही देत राहिला नरकयातना

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, चोरी झालेल्या पर्समध्ये तीन पदरी सोन्याचा हार, सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, सोन्याचा वेढा, विवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. प्रकार उघडकीस आल्यानंतर विवाहस्थळी एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Nashik, Theft