नाशिक, 16 ऑक्टोबर: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील आंबेवाडी गावातील एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित मुलगी आपल्या घरच्या शेततळ्यात पाळलेल्या माशांना खायला टाकायला गेली (went to feed fishes) असता, तिचा शेततळ्यात बुडून मृत्यू (Drowned into pond and dead) झाला आहे. घरी कोणीही नसताना, ही घटना घडली आहे. त्यामुळे संबंधित मुलगी शेततळ्यात पडल्याची माहिती कोणालाच नव्हती.
बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केल्यानंतर संबंधित शाळकरी मुलीचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला आहे. मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-'सोबत जगता नाही आलं तर सोबत मरू', नाशकात प्रेमीयुगुलानं उचललं भयावह पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मृत मुलीचं नाव उर्मिला दत्तात्रय बोराडे असून ती येवला तालुक्यातील विसापूर हद्दीतील आंबेवाडी येथील रहिवासी आहे. मृत उर्मिला ही विद्यार्थिनी असून ती नेहमी आपल्या घरातील शेततळ्यात माशांना खायला टाकायची. दरम्यान, घटनेच्या दिवशीही उर्मिला माशांना खायला टाकायला गेली होती. यावेळी घरी कुणीही नव्हतं. माशांना खायला टाकत असताना, तिचा पाय घसरून ती थेट शेततळ्यात पडली.
हेही वाचा-...अन् रात्री बैलासह शेतमजूर कोसळला विहिरीत; लख्ख काळोखातील हृदय हेलावणारी घटना
यावेळी उर्मिलाच्या आजूबाजूला किंवा घरी कोणीच नव्हतं, त्यामुळे तिला वाचवण्यासाठी कोणीही येऊ शकलं नाही. या दुर्दैवी घटनेत मुलीच्या नाका तोंडात पाणी शिरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उर्मिलाच्या घरातील सदस्य घरी आल्यानंतर, त्यांनी उर्मिलाची सर्वत्र शोधाशोध केली. पण उर्मिला त्यांना कुठेच दिसत नव्हती. अखेर उर्मिलाचा मृतदेह शेततळ्यात आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik