Home /News /maharashtra /

Nashik: हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात; पाय घसरुन महिला पडली विहिरीत, नाशिकमधील धक्कादायक घटना, VIDEO

Nashik: हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात; पाय घसरुन महिला पडली विहिरीत, नाशिकमधील धक्कादायक घटना, VIDEO

VIDEO: हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात; पाय घसरुन महिला पडली विहिरीत, नाशिकमधील धक्कादायक घटना

VIDEO: हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात; पाय घसरुन महिला पडली विहिरीत, नाशिकमधील धक्कादायक घटना

पाणी भरण्यासाठी गेलेली एक महिला तोल जाऊन विहिरीत पडल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 7 जून : राज्यातील विविध भागांत सध्या भीषण पाणी टंचाई (major water scarcity) पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अशीच परिस्थिती नाशिक (Nashik)मध्ये सुद्धा आहे. नाशिकमधील बोरीची बारी या गावात (Borichi Bari village Nashik) एक धक्कादायक घटना घडली आहे. पाणी भरण्यासाठी गेलेली महिला थेट विहिरीत कोसळली. (Woman fall in well at Nashik) पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिला जीवावर उदार होऊन पाणी भरत आहेत. आपला जीव धोक्यात टाकत महिला हंडाभर पाणी मिळवतानाचं चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे एक महिला पाणी भरण्यासाठी गेली असता तिचा तोल गेला आणि थेट विहिरीत कोसळली. नाशिकमधील पेठ तालुक्यातील बोरीची बारी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीत कोसळताच महिलेने बचावासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या महिलेचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी विहिरीत उतरत आणि दोरीच्या सहाय्याने या महिलेला बाहेर काढण्यास सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर ग्रामस्थांनी या महिलेला सुरक्षित बाहेर काढले आहे. वाचा : घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडलं? पाहा थरारक घटनेचा CCTV विहिरीत बऱ्यापैकी पाणी असल्याने या महिलेला गंभीर दुखापत झालेली नाहीये. जर विहिरीत पाणीसाठा कमी असता तर या महिलेला गंभीर दुखापत झाली असती. नाशिकमध्ये घडलेली ही घटना पहिल्यांदाच घडली नाहीये तर यापूर्वीही अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला इगतपुरीतील काही गावांची पाड्यांची अवस्था "धरण उशाला आणि कोरड घशाला", अशी झाली आहे. इथल्या महिला, लहान मुले दिवसभर इतरत्र पाण्याच्या शोधात वणवण करताना दिसत आहेत. त्यातही कधी गढूळ तर कधी दुर्गंधीयुक्त पाणीच नशिबाला येते. इथल्या पाड्यांची अवस्था इथले स्थानिक प्रशासन चांगलीच जाणून आहेत. मात्र, तरीसुद्धा ही अवस्था पालटायला काहीच प्रयत्न होतांना दिसून येत नाहीये. एकीकडे इगतपुरी नगरपरिषद मोठ्या थाटामाटाने 24 तास भावलीची पाणी योजना इगतपुरीत चालू करत आहे. मात्र, असे असताना दुसरीकडे इगतपुरीतीलच कथरूवांगण या आदिवासी पाड्याची वेगळीच व्यथा आहे. हात धुणे तर सोडाच प्यायला एक घोट पाणी सुद्धा येथील बांधवांना मिळेनासे झाले आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Drink water, Nashik, Water

    पुढील बातम्या