नाशिक, 18 जून : नाशिक (Nashik News) जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. नाशिकसह मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात केवळ २५ टक्के तर जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये २१ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक राहिल्याने नाशिक जिल्ह्यावरील पाणी कपातीच संकट गडद झालं आहे.
जून महिन्याच्या दुसरा आठवडा लोटूनही नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यात पाणी-बाणी निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात २५२ वाडी वस्त्या आणि गावांना ८४ टँकरद्वारे २०० फेऱ्याद्वारे दीड लाखांहून अधिक नागरिकांची ताहन भागवली जात आहे. मात्र पुढच्या आठवडाभरात जिल्ह्यात पावसाने अशीच दडी मारली तर नाशिक शहरवासियांवर पाणी कपात लादली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर जिल्ह्यातील २४ धरणांपैकी ४ धरणांमधील पाणी साठा शून्य झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही धरणांहून सोडलं जाणार पाण्याच आवर्तन बंद होऊ शकत अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात 7 मोठे तर 16 मध्यम प्रकल्प आहे. या सर्व धरणांमध्ये केवळ 21 टक्के इतका पाणी साठा शिल्लक राहिला आहे. गत वर्षी हाच साठा २७ टक्के इतका होता तर ४ धरणांमध्ये शून्य टक्के इतका पाणी साठा राहिल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहात सद्यस्थितीत किती पाणीसाठा शिल्लक आहे.
गंगापूर धरण समूह - २५ टक्के
पालखेड करंजवन समूह - १९ टक्के
ओझारखेड पूनेगाव समूह - २० टक्के
दारणा नंदुरमध्यमेश्वर समूह - २४ टक्के
चणकापुर गिरणा समूह - २७ टक्के
पूनद मानिकपुंज - १४ टक्के
तर जिल्ह्यातील तीसगाव, नागासाक्या, मानीकपुंज, केळझर या चार धरणांमध्ये तर पाणीसाठा शून्य टक्क्यांवर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे जिल्ह्यातील धरण हळू हळू तळ गाठत येत्या आठवडा भरात पाऊस न पडल्यास जिल्ह्यात पाणी बाणी अधिक गडद होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.