Home /News /maharashtra /

Video : शिवसेनेतील मुस्लीम मावळ्याने ठाकरेंसाठी रक्ताने लिहिलं पत्र, आदित्य यांच्या संवादयात्रेदरम्यान घडला प्रकार

Video : शिवसेनेतील मुस्लीम मावळ्याने ठाकरेंसाठी रक्ताने लिहिलं पत्र, आदित्य यांच्या संवादयात्रेदरम्यान घडला प्रकार

या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

    शिर्डी, 23 जुलै : एकनाथ शिंदे ५० आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. अधिकृतपणे ते शिवसेनेत असल्याचा दावा करीत असले तरी शिवसेना फुटल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पक्ष फुटला, नेते विभागले तसं शिवसैनिकही दुभंगले गेले. अनेक शिवसैनिकांना शिवसेनेतील फूट असह्य होत आहे. दरम्यान राहिलेली शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभरात संवाद यात्रा काढली आहे. आज संवाद यात्रेदरम्यान ते शिर्डीला होते. आदित्य ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यात शिवसेनेच्या एका मुस्लीम मावळ्याने स्वतःच्या रक्ताने आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्याने पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्याने आदित्य ठाकरे यांना दिलं. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा आणि नंतर शिर्डीत कार्यकर्तांशी संवाद साधत या दौऱ्याची साईदर्शनाने सांगता झाली. मात्र यादरम्यान मुस्लीम कार्यकर्त्याने उचललेल्या या पावसामुळे लोक भावुक झाले. शिवसेनेतील तब्बल ५० आमदार फुटणे ही महाराष्ट्राच्या राजकारणाला झटका देणारं वृत्त होतं. अनेकांना या वृत्तामुळे हादरा बसला. मात्र सर्वाधिक धक्का हा सर्वसामान्य शिवसैनिकांना बसला. अनेक वर्षांपासून आपल्या नेतृत्वासाठी अहोरात्र झटणाऱ्या या शिवसैनिकांना आपल्याच कुटुंबाचे दोन भाग होताना पाहावे लागले. अनेकांना शेवटपर्यंत वाटत राहिलं की, गेलेले आमदार परत येतील. मात्र तसं काहीच झालं नाही. उलटपक्षी एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर आता आदित्य ठाकरे महाराष्ट्रभरात संवाद यात्रा करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांची भेट घेतली आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. गंगापूर येथील एका सभेदरम्यानच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Nashik, Shirdi, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या