मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशिकमध्ये निघाली दाजीबा वीरांची मिरवणूक, पाहा 300 वर्षांची काय आहे परंपरा

नाशिकमध्ये निघाली दाजीबा वीरांची मिरवणूक, पाहा 300 वर्षांची काय आहे परंपरा

X
Nashik

Nashik News : ऐतिहासिक दाजीबा वीरांची मिरवणूक बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

Nashik News : ऐतिहासिक दाजीबा वीरांची मिरवणूक बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

    विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी

    नाशिक 8 मार्च : धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनला एक अनोखी परंपरा आहे. जुने नाशिक परिसरातून वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक काढली जाते. जवळपास 300 वर्षांपासून ही परंपरा सुरु असून, हा दाजीबा नवसाला पावणारा देव असून तो सर्वांचे विघ्न दूर करतो अशी भावना नाशिककरांमध्ये आहे. यावर्षीही जुन्या नाशिकमधून दाजीबा बाशिंग मिरवणुकीला सुरुवात होऊन जूनी तांबट लेन, रविवार पेठ मार्गे गंगाघाटावरून परत जुन्या नाशिकमध्ये या मिरवणुकीचा समारोप झाला. दरम्यान ऐतिहासिक दाजीबा वीरांची मिरवणूक बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

    अशी सांगितली जाते आख्यायिका

    नाशिक जिल्ह्यातील जानोरी गावांमध्ये वीर दाजीबा राहत होते. त्यांचं लग्न होतं, होळीच्या दिवशी त्यांना हळद लागली होती. मात्र, त्याच वेळी काही चोर आणि दरोडेखोरांसोबत त्यांची लढत झाली. त्या लढतीत त्यांना वीरमरण आले. दुसऱ्या दिवशी त्यांचं लग्न आणि आदल्या दिवशी म्हणजे त्यांच्या हळदीच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ पसरली. तेव्हापासून म्हणजे गेल्या 300 वर्षांपासून भाचा म्हणून बेलगाव घराण्याकडे या वीर दाजीबाचा मान आहे. धुलीवंदनच्या दिवशी त्यांना हळद लावून, देवाचे सोंग घेऊन, बाशिंग बांधून, हलगीच्या तालावर नाचत त्यांची संपूर्ण नाशिक शहरात मिरवणूक काढली जाते.

    Holi 2023 : काठीच्या राजवाडी होळीत रंगले आदिवासी बांधव! 5 दिवस चालणार मोठा उत्सव, Video

    मिरवणुकी दरम्यान अनेक नागरिक या वीर दाजीबाची पूजा करतात. नवस बोलतात, कोणाला बाळ होत नसेल, किंवा कोणाचं लग्न होत नसेल, आणि तो जर नवस वीर दाजीबाला बोलला तर पुढील वर्षात नवस पूर्ण होतो. अशी नाशिककरांची भावना आहे. त्यामुळे अनेक जण वीर दाजीबाला आपला नवस बोलतात. ही वीर दाजीबाची मिरवणूक रात्रीच्या सुमारास गोदावरीवर पोहोचते. तिथं गोदावरीमध्ये देवांना स्नान करून पुन्हा ही मिरवणूक घराकडे माघारी फिरते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेच्या सुमारास वीर दाजीबा आपल्या घरी पोहोचतात,अशी माहिती नंदन भास्करे यांनी दिली आहे.

    Holi 2023: धुलिवंदनाला जावयाची निघाली गाढवावरून मिरवणूक, बीड जिल्ह्यातील अजब परंपरेचे पाहा Photos

    दाजिबा वीरांच्या मिरवणुकीत नाशिककर मोठ्या हौसेनं सहभागी झाले होते. या पारंपारिक मिरवणुकीमुळे नाशिकमधील वातावरण भक्तिमय झालं होत.

    First published:
    top videos

      Tags: Holi 2023, Local18, Nashik