मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'2024 ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार', संजय राऊतांनी नाव केलं जाहीर

'2024 ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार', संजय राऊतांनी नाव केलं जाहीर

'एकनाथ शिंदे हे राजीनामा द्यायला निघाले होते, फडवणीसांच्या त्रासाला कंटाळून, शिवसैनिकांचा छळ करतो, शिवसेना संपायला फडणवीस निघाले आहे असं शिंदे म्हणाले होते.

'एकनाथ शिंदे हे राजीनामा द्यायला निघाले होते, फडवणीसांच्या त्रासाला कंटाळून, शिवसैनिकांचा छळ करतो, शिवसेना संपायला फडणवीस निघाले आहे असं शिंदे म्हणाले होते.

'एकनाथ शिंदे हे राजीनामा द्यायला निघाले होते, फडवणीसांच्या त्रासाला कंटाळून, शिवसैनिकांचा छळ करतो, शिवसेना संपायला फडणवीस निघाले आहे असं शिंदे म्हणाले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  sachin Salve

नाशिक, 07 जानेवारी : '2024 ला महाराष्ट्रातील राजकारण बदलणार आहे. पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहे. जी ताकत दिसतेय शिवसेनेला ती तिथेच आहे. ठाण्यात आता निवडणूक होऊ द्या. मनपाची पुन्हा झेंडा ठाणे महापालिकेवर फडकावेल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या मेळाव्यात राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला.

" isDesktop="true" id="810855" >

' संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे शिवसेनेची लाट उसळली आहे. निवडणूक येऊ द्या, मग पाहतो लोक म्हणत आहेय नेहमी पेक्षा जास्त गर्दी आहे. 2 गेले की 100 येतात. 2-4 गेले तर काय फरक पडत नाही, शिवसेना अस्वल 2-4 केस उपटले फरक पडत नाही. मुख्यमंत्री नेमकं शिंदे की, फडवणीस काहीच कळत नाही. राज्यात दोन मुख्यमंत्री आहे. दोन मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करणारे केंद्रात 4 मदारी आहे, अशी टीकाही राऊतांनी केली.

(भावाने गुंडगिरी केली का, गरिबांची दुकानं का पाडली? गोपीचंद पडळकर म्हणाले...)

'एकनाथ शिंदे हे राजीनामा द्यायला निघाले होते, फडवणीसांच्या त्रासाला कंटाळून, शिवसैनिकांचा छळ करतो, शिवसेना संपायला फडणवीस निघाले आहे असं शिंदे म्हणाले होते. मग आता काय फडवणीस कुठे घेऊन चालले आहे. भारतीय जनता पक्ष या लोकांना काढून त्यांच्यावरती त्यांचा झेंडा फडकावेल. 25 वर्ष आम्ही भोगले. जे आमचे नाही झाले ते तुमचे काय होणार, ही फौजदारी जास्त दिवस चालणार नाही. नागपुरातील 12 प्रकरणं कुणी दिली एकाच गटातील. ज्यांना हे कळलं त्यांना राजकारण पूर्ण कळलं, असा टोलाही राऊत यांनी शिंदेंना लगावला.

'2024 ला महाराष्ट्रातील राजकारण बदलणार आहे. पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहे. जी ताकत दिसतेय शिवसेनेला ती तिथेच आहे. ठाण्यात आता निवडणूक होऊ द्या. मनपाची पुन्हा झेंडा ठाणे महापालिकेवर फडकावेल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

आजच मरण उद्यावर ढकलले जात आहे, जेव्हा वेळ येईल न्यायालयाचा हातोडा यांच्या डोक्यात पडेल. जेलचा दरवाजा उघडा आहे. लात मारून आत टाकेल जाईल. दीपक केसरकर म्हणतो तुरुंगात जावे लागेल तुझ्या बापाचे न्यायालय आहे का ? एक एकाचे प्रकरण बाहेर येईल, असा इशाराही राऊत यांनी दीपक केसरकरांना दिला.

'आम्ही बेईमनाच्या मांडीला मांडी लावून पुन्हा बसणार नाही,गेले त्यांना परत घेणार नाही. आगीच्या ठिणगीतून वणवा पेटवणारी शिवसेना आहे. खरे अग्निवीर शिवसेनेत आहे. ठिणग्या आहे. ठिणग्यांवर राख साठत नाही, ज्यांच्यावर राख साठली ती राख उडून गेली, असं म्हणत राऊत यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली.

(आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात; टँकरने मागून धडक दिली अन्..)

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या आजरपणात पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. रुग्णालयात होते शस्त्रक्रिया केली होती, अश्या वेळी हे 40 लोक त्यांचा नेता ठरवत होते पक्षाशी गद्दारी करण्याचा प्लॅन सुरू होता. त्यांचा सूड घेतला नाही तर आपण शिवसेना म्हणण्याच्या लायक नाही. या आगीशी खेळू नका,कोणाला जायचे असेल त्यांनी आनंदाने जावे, आम्ही त्यांना बँड बाजा देऊ, पाहिजे तिथे पोहोचवू. कसली क्रांती केली, गद्दारीला क्रांती नाही म्हणत. क्रांती आता होईल, जनता करेल उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहून खरी क्रांती होईल, असंही राऊत म्हणाले.

'भाजपचं मिशन 145 असेल तर शिंदे गट कुठे आहे. आमचा आकडा 185 चा आहे. हे सगळे घरी जाणार आहे. खासदार गोडसे तर कायमचा घरी जाईल दरवाजा लावून बसणार आहे. वर्षा बंगल्याची निष्ठा घालून टाकली यांनी. शिवसेना इथेच आहे समोर आहे. महिला आघाडी वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. जे गेले ते माजी विरोधी पक्ष नेते पुन्हा निवडून येणार नाही. दगड मारणारे गेले, शिंदे गटात गेले ,आमचं आख आयुष्य दगड मारण्यात गेले,उगाच मी जेल मध्ये गेलो नाही. मधल्या काळात देव चोरीला गेले, मंदिरातले हे चोर, चप्पल चोर आहे, अशी टीकाही राऊत यांनी शिंदे गटावर केली.

'बाळासाहेब सांगायचे अनेक जणांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसले. काही श्रीखंड भात खाऊन जातात, मला कळत. बाळासाहेब म्हणायचे जे कोणी घाण आणले भाजपमधून हे टिकणार नाही. चायनीज माल आहे. कालपासून मूर्ती समोर आणायला लागलो, खरंच चायनीज माणूस निघाला. यांना काय काय नाही दिले भरपूर पद दिले. दुसऱ्या दिवशी हे मानूस मला गाडीपर्यंत सोडायला आले होते, प्राण जाईल तरी जाणार नाही बोलले होते. हे तुडवायच्या लायकीचे नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी माजी विरोधी पक्ष नेते नाशिक मनपा अजय बोरस्ते यांच्यावर टीका केली.

First published: