मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजपचं बारसं ते शिंदेंना ओपन चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील कळीचे मुद्दे

भाजपचं बारसं ते शिंदेंना ओपन चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील कळीचे मुद्दे

शिवसैनिकांसाठी नवा नारा

शिवसैनिकांसाठी नवा नारा

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेवर तोफ डागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 26 मार्च : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधल्या मालेगाव येथे मोठी सभा पार पडली. पक्षाची मोट पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार आहेत. त्यापैकी पहिली सभा कोकणातील खेड येथे झाली. तर दुसरी सभा आज मालेगावात पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी फडणवीस यांच्या एका वक्तव्याची खिल्ली उडवली तर शिंदे यांना खुल आव्हान दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठकल मुद्दे जसेच्या तसे

मलाच समजत नाही या सभेचे काय वर्णन करायचे, आजची सभा अथांग आहे. आपल नाव चिन्ह चोरलय माझ्या हातात काही नाही तरी पण इतकी गर्दी ही पूर्वजांची आणि आई जगदंबेचे आशीर्वाद. मी मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर तुमच्यासाठी उभा आहे. अनेक वर्षांनी मालेगावात. कोरोना काळात मुंबई धारावी आणि मालेगावची परिस्थिती चिंताजनक. मालेगावच्या धर्मगुरूं सोबत चर्चा केली. तुम्ही सहकार्य केले म्हणून संकटावर मात करु शकलो. तुम्ही कुटुंबाचा सदस्य मानले.

गद्दारांनी नाव चिन्ह चोरले पण त्यांच्या नशिबात जिवाभावाच्या माणसाचे हे प्रेम नाही. अद्वय यांना धन्यवाद हा मर्द गडी आहे. तिथून इकडे आलाय. एकमेव संयुक्त महाराष्ट्राचा धागा आहे. गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली. किती खोक्यांना झाली? मग तुमच्या कांद्याला भाव मिळायला हवे. अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती महात्मा फुलेंच्या नावाने योजना.  सत्ता आल्यावर पहिले काम केली  कर्जमुक्ती. द्राक्ष बागायदारांना मदत करायची. पिकेल ते विकेल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. आज शेतकऱ्यांना भेटलो दागिने गहाण ठेवले. परंतु नातीचे लग्न लांबले. कृष्णा डोंगरेंच्या रक्ताने पत्र लिहिले पण मुख्यमंत्री वाचून भाषण करतात पण पत्र वाचता येत नाही. ह्यावर आवाज उठवणार का?  यांच्या गळ्यात दोरी बांधली आहे. दिवाळीत मुख्यमंत्री रमले शेतीत. हॅलिकाॅप्टरने शेतात गेले पण बांध्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. कृषीमंत्री दिसले का?  महिलांना शिवीगाळ केली. हे ह्यांचे हिंदुत्व. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्यावर कृषीमंत्री अपमानास्पद वक्तव्य करतात. केंद्रीय कृषीमंत्री काहीच करत नाही. मविआने अवकाळी पाऊस झाल्यावर तात्काळ मदत केली. सत्ता गेल्याचे दुख नाही पण चांगले काम करणारे सरकार गद्दारी करुन पाडले. खंडोजी खोपड्यांची औलाद. गद्दारांना हातात भगवा घेण्याचा अधिकार नाही. तुमची ओळख गद्दारच राहणार.

वाचा - 'सत्ता गेल्याचं दु:ख नाही, पण..' उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; 'जिकडे तुम्ही जाल..'

मग आयुक्त काय फुटपाथवर बसणार आहेत का? : ठाकरे

उद्योग सावरावा तेव्हा मविआने वीज दरात सवलत. वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवले. सगळ्यांना मुंबई जवळ होत पण मिंधे चुप बसले. उपमुख्यमंत्री म्हणतात कार्यालय नाही नेले आयुक्त फक्त गेले मग आयुक्त काय फुटपाथवर बसणार आहेत का? मुंबईचे महत्व मारायचे हे कुठले सरकार. निवडणुक आयोगाचा गांडुळ झालय. खेड आजची सभा बघितली तर कळेल शिवसेना कुठली. लाखोंच्या संख्येने आपण प्रतिज्ञापत्र दिली ती रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून नाही दिली. होय ही शिवसेना माझ्या वडिलांनी निर्माण केली मिंध्यांची नाही.

लोकशाहीचे भवित्व्य वाईट आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील म्हणाले हे सत्तांतर दगड ठेवून घेतलय. आताचे बावनकुळे म्हणतात आम्ही मिंधे गटाला 48 जागाच देणार. बावनकुळेंनी नावाप्रमाणे तरी जागा द्यावी. भाजपने जाहीर करावे मिंधेंना नेते म्हणून निवडणुक लढणार का? तुमची 52 काय 152 कुळ आली तरी ठाकरेंपासून तुम्ही दूर नेऊ शकत नाही. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुक लढवा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो पण निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा.

भाजपने कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलय. परवाच भाजप आमदार वॉशिंग पावडर बद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कस हे सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही.

वाचा - 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना त्याच खोक्या खाली..' संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

एक तरी अशी घटना दाखवा मुख्यमंत्री झाल्यावर मी हिंदुत्व सोडले. जे माझे आजोबा वडील बोलायचे शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. अनिल देशमुखांच्या नातीची चौकशी, लालूप्रसाद यादवांच्या सुनेची बेशुद्ध होईस्तोवर चौकशी. हे तुमचे हिंदुत्व. आता उघडपणे बोलतात आम्हाला शांत झोप लागते हर्षवर्धन पाटील म्हणाले. गुजरातला आधी का गेले हे आता समजले काय धुतले माहिती नाही.

काल राहुल गांधींची पत्रकार परिषद. हिडनबर्गने घोटाळे काढले पण त्याकडे लक्ष नाही. राहुल गांधींना जाहीर सांगतो सावरकर आमचे दैवत त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. सावरकर काय होते हे आपण वाचू  शकतो. अष्टभुजेसमोर शपथ घेणारे सावरकर. 15 व्या वर्षी ही सावरकरांची शपथ. सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही 14 वर्ष छळ सोसला ते बलिदानच. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय.आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही लोकशाही वाचवण्याची आहे. भाजप मधील सावरकर भक्त आहात तर अंध भक्त होऊ नका.

15 दिवसांपूर्वी संजय कदम, अद्वय आले हे सभा सभारंभ पुरता असू नये. ही लढाई देशाची, शेतकऱ्यांची आहे. तुमची मला आवश्यकता आहे. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन उचलला तसा लोकांनी पण हातभार लावला तसा तुम्ही पण हातभार लावा. रावण धनुष्य घेताना उताणा पडला तिथे हे मिंधे कोण? मी तुमच्या सोबतीने लढायला उभा आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray