मालेगाव, 26 मार्च : 'भाजपला विचारतो, या मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहात का, हे भाजपने जाहीर करावं, त्याही पेक्षा प्रत्येक सभेत आव्हान देत असतो. जर भाजपला असं वाटत असेल आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, तुमचे 52 काय एकशे 52 कुळं सुद्धा ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करू शकत नाही. प्रयत्न करून पाहा' असा आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं.
नाशिकमधल्या मालेगाव येथे मोठी सभा होत आहे. यासाठी ठाकरे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली आहे.
('ज्यांनी गद्दारी केली, त्यांना त्याच खोक्या खाली..' संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन)
ही शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली. मिधेंच्या वडिलांनी नाही. ज्याला स्वत:च्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, म्हणून तुम्ही माझ्या वडिलांचं नाव घेता, माझ्या वडिलांनी निर्माण केलेली शिवसेना तुम्ही चोरता. पण आज जे एकूण वातावरण देशात चाललेलं आहे, ते पाहिल्यावर, ही लढाई माझी एकट्याची नाही, ही आपल्या देशाच्या लोकशाहीची लढाई आहे. चंद्रकांत पाटील बोलले आहे, मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद दिलं आहे. आताचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं, शिंदे गटाला 48 जागा देणार आहोत, अहो बावनकुळे तुमच्या नावाएवढ्या 52 जागा तरी द्या, तुमच्यासाठी जिवंत माणसांचं त्याग करून तुमच्यासोबत आले, त्यांना 48 जागांमध्ये आटोपणार आहात का? असा टोला ही उद्धव ठाकरेंनी लगावला.
(BREAKING : उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी CM शिंदे पोहोचले राज ठाकरेंच्या घरी!)
भाजपला विचारतो, या मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहात का, हे भाजपने जाहीर करावं, त्याही पेक्षा प्रत्येक सभेत आव्हान देत असतो. जर भाजपला असं वाटत असेल आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, तुमचे 52 काय एकशे 52 कुळं सुद्धा ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करू शकत नाही. प्रयत्न करून पाहा. मी म्हणतो निवडणुका घेऊन दाखवा, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मत मागा, मी माझ्या वडिलांना नावाने मत मागतो, मग बघू जनता कुणाला कौल देते. आज सुद्धा तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतं. इथंच तुमची हार आहे. ज्या शिवसेनेनं तुम्हाला जन्म दिला, त्या राजकारणातल्या आईवर वार करणारे हे चोर आहे. हे लोक तुमच्यासमोर धनुष्यबाण घेऊन फिरणार आहे. भाजप म्हणजे भ्रष्ट जनतेचा पक्ष, असं नामकरणही उद्धव ठाकरेंनी केलं.
काल राहुल गांधींची पत्रकार परिषद मी पाहिली. चांगलं बोलतंय पोरगं. त्यांनी एक प्रश्न विचारलं. त्याचं उत्तर भाजपकडे नाही. फक्त राहुल गांधींना मला एक सांगायचंय. संजय राऊत तिकडे गेले. आम्ही तुमच्या सोबत होतो. आज जाहीर राहुल गांधींना सांगतो. सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. आम्हाला त्यांचा अपमान सहन होणार नाही' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावलं.
सावकर काय होते, हे आपण वाचू शकतो पण त्यांनी काय केलं... चाफेकर बंधूंना फाशी दिल्यावर घरातल्या अष्टभुजा देवीसमोर जाऊन शपथ घेतो की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या शत्रूला चाफेकरांसारखा मारत मारत मरेन, किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन, हे 15 वर्षी शपथ घेणारे सावरकर. त्यांच्या वाड्यात भगूरला मी शिवसेनाप्रमुखांबरोबर गेलो आहे. त्या काळातली त्यांची शस्त्र, सावकरांचे वडील हे टिळक भक्त आणि सावकरांनी जे काही केलं. ते येड्या-गबाळ्याचं काम नाही. 14 वर्ष नरकयातना, छळ त्यांनी भोगले. ते एक प्रकारचे बलिदानच आहे. म्हणून मी राहुल गांधींना सांगतोय... आपण एकत्र आलो आहोत. ते देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी.. या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आलो आहोत. त्याच्यामध्ये फाटे फुटू देऊ नका. मुद्दामून तुम्हाला डिवचलं जातंय. आता जर वेळ सुटली..वेळ चुकली.. तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने हे कारभार करताय, तो कारभार पाहिल्यानंतर जर पुन्हा हा 2024 मध्ये पुन्हा हे तिथे बसले तर त्यानंतर देशात निवडणुका होणार नाही.. देशातील लोकशाही संपली. म्हणून ही लढाई उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची नाही तर आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav Thackeray