मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik: श्रद्धांजली वाहायला आले अन् एकमेकांची फोडली डोकी, सरणासाठी रचलेल्या लाकडांनी केली मारहाण

Nashik: श्रद्धांजली वाहायला आले अन् एकमेकांची फोडली डोकी, सरणासाठी रचलेल्या लाकडांनी केली मारहाण

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Nashik: ज्येष्ठ लोककवी विनायक पाठारे यांच्या अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये आलेल्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 29 डिसेंबर: ज्येष्ठ लोककवी विनायक पाठारे यांच्या अंत्यसंस्कारासाठी (poet vinayak pathare death) अमरधाममध्ये आलेल्या दोन गटांत तुफान हाणामारी (two group beat each other) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजकीय कारणातून कुरापत काढल्यानंतर दोन गटांनी सरणासाठी रचलेल्या लाकड्याच्या सह्याने एकमेकांना मारहाण केली आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात जाऊन परस्पर विरोधी गुन्हे (FIR lodged) दाखल केले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांच्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक (Nashik) येथील ज्येष्ठ कवी, गीतकार विनायक पाठारे यांच्यावर सोमवारी दुपारी अमरधाम (Amardham) याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पाठारे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनिल गांगुर्डे आणि प्रशांत गांगुर्डे आपल्या काही साथीदारांसह उपस्थित होतं. याचवेळी नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक राहुल दिवे देखील आपल्या काही कार्यकर्त्यांसह पाठारे यांच्या अंत्यसंस्काराला आले होते.

हेही वाचा-10 वर्षांचा संसार क्षणात मोडला; प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेनं पतीचा घेतला जीव

यावेळी दिवे यांनी गांगुर्डे यांना शोकसभेतून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. पण गांगुर्डे यांनी श्रद्धांजली सभेतून निघून जाण्यास नकार दिला. यानंतर संशयितांनी सरणासाठी रचलेल्या लाकडांनी गांगुर्डे यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे गांगुर्डे गटाने जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला, अशी तक्रार विक्रांत गांगुर्डे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली. या मारहाणीत गांगुर्डे पिता-पुत्र जखमी झाले आहेत.

हेही वाचा-NCP नगरसेवकाच्या मुलाचा विवाहितेवर बलात्कार; जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार

दुसरीकडे, अनिल गांगुर्डे आणि इतरांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार जयेश सोनवणे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात केली आहे. खरंतर काही दिवसांपूर्वी विक्रांत गांगुर्डे यांचा वाढदिवस होता. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लावले होते. पण दिवे यांच्या घरातील महिलांनी हे बॅनर फाडून टाकल्याचा आरोप विक्रांत गांगुर्डे यांनी केला होता. याचा वादावरून कुरापत काढत दिवे यांनी गांगुर्डे पिता पुत्रांवर हल्ला केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Nashik