मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

62 वर्षांच्या आजी निवांतपणे घरी जात होत्या, तितक्यात पाठी मागून तो आला आणि..., LIVE VIDEO

62 वर्षांच्या आजी निवांतपणे घरी जात होत्या, तितक्यात पाठी मागून तो आला आणि..., LIVE VIDEO

 रस्त्यावरून एकटं जात असताना एका वृद्ध महिलेची पर्स हिसकावून पळ काढण्याऱ्या चोराचा व्हिडीओ

रस्त्यावरून एकटं जात असताना एका वृद्ध महिलेची पर्स हिसकावून पळ काढण्याऱ्या चोराचा व्हिडीओ

रस्त्यावरून एकटं जात असताना एका वृद्ध महिलेची पर्स हिसकावून पळ काढण्याऱ्या चोराचा व्हिडीओ

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  sachin Salve

नाशिक, 24 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावरून एकटं जात असताना एका वृद्ध महिलेची पर्स हिसकावून पळ काढण्याऱ्या चोराचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेमुळे वृद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद परिसरात ही घटना घडली आहे. एक 62 वर्षीय वृद्ध आजी संध्याकाळी रस्त्यावर फेरफटका मारून घरी चालल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून एक चोर आला आणि त्याने त्यांच्या हातातून पर्स हिसकावून घेतली. पर्स हिसकावत असताना वृद्ध महिलेनं त्याला विरोध केला. पण चोराने वृद्ध महिलेच्या हातावर वार करून पर्स घेऊन पळ काढला.

या पर्समध्ये मोबाइल फोन आणि रोख रक्कम असा 14 हजारांचा मुद्देमाल होता. हा सगळा प्रकार रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे. या प्रकरणा महिलेनं तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहे.

मुले चोरणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण

दरम्यान, लहान मुले चोरणारी टोळी समजून मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच आता अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. यात मुले चोरणारी टोळी म्हणून दोघांना जमावाने बेदम मारहाण केली. नाशिकच्या गंजमाळ भागात ही घटना घडली. नाशिकमध्ये मुले चोरी करणारी टोळी आल्याची अफवा पसरली आहे. शहराच्या अनेक ही अफवा पसरली आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुले चोरणारी टोळी आल्याची अफवा व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याच कारणामुळे नागरिक प्रत्येकाला संशयाच्या नजरेत बघत असून अशा घटना घडत आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी गंजमाळ परिसरात घडली. यात चोर एका चारचाकी गाडीच्या नंबर प्लेटवर कलर टाकून गाडीमध्ये असलेली बॅग पळवण्याच्या तयारीत असताना ही बाब वाहनचालकाच्या निदर्शनास आली.

First published: