Home /News /maharashtra /

आंबे तोडणे जिवावर बेतले, विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

आंबे तोडणे जिवावर बेतले, विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यूनाशिक जिल्ह्यातील इंदिरा नगर राजसारथी सोसायटी इथं ही घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील इंदिरा नगर राजसारथी सोसायटी इथं ही घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील इंदिरा नगर राजसारथी सोसायटी इथं ही घटना घडली आहे.

नाशिक, 24 मे :  लोणावळ्यामध्ये दिल्लीत एका इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नाशिकमध्ये (nashik) एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या ( software engineer ) दुर्दैवी मृत्यूची बातमी समोर आली आहे. आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या या तरुणाचा विजेचा जबरदस्त झटका ( electric shock) लागला. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील इंदिरा नगर राजसारथी सोसायटी इथं ही घटना घडली आहे. अनिरुद्ध धुमाळ (anirudha dhumal) (वय 30) असं तरुणाचं नाव आहे.  अनिरुद्ध धुमाळ हा सॉफ्टेवअर इंजिनिअर होता. आज दुपारी तो घरातील झाडावरील आंबे तोडण्यासाठी चढला होता. झाडावर तो शिडीच्या सहाय्याने चढला होता. धक्कादायक म्हणजे, झाडामधून विजेचा तारा गेल्या होत्या. शिडीवर चढून आंबे तोडत असताना अचानक शिडीचा स्पर्श विजेच्या तारेशी झाला. त्यामुळे तो अनिरुद्धला विजेचा जोराचा धक्का बसला. विजेचा धक्का बसल्यामुळे अनिरुद्ध झाडावरून खाली फेकला गेला. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. (ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अशी झाली होती नीतूंची अवस्था, आता केला खुलासा) अचानक अनिरुद्ध झाडावर खाली फेकला गेल्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने झाडाकडे धाव घेतली. अनिरुद्धला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अनिरुद्धच्या निधनामुळे धुमाळ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिल्लीतला इंजिनिअर तरुणाचा आढळला मृतदेह दरम्यान,  दिल्लीतील एक अभियंता शुक्रवारी (20 मे 2022) लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज येथे सहलीला आला होता. त्यावेळी तो बेपत्ता झाला होता.  फरहान शहा (Farhan Shah) असं त्याचं नाव आहे. त्याच्या शोधासाठी एनडीआरएफ, लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव सरंक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक कार्यरत होते. आज शोधमोहिमे दरम्यान फरहान शहा याचा मृतदेह आढळून आला. (IPL 2022 : इमर्जिंग प्लेयर अवॉर्ड कुणाला मिळणार? 5 जणांमध्ये रेस, मुंबईचे दोघं!) लोणावळा आणि खंडाळाच्या घनदाट झाडीत हरविलेल्या अभियंत्याचा शोध घेण्यासाठी NDRF चं पथक पोहचलेलं. तत्पूर्वीच आज सकाळी आयएनएस शिवाजीच्या जवानांना दरीतून दुर्गंधीचा वास आला होता. त्याच दिशेने NDRF चे जवान दरीत उतरले. तिथं फरहाणच्या टी शर्ट आढळला. फरहान याचा मृतदेह आढळून आला आहे. नागफणी सुळका उतरताना तो कोणत्या पायवाटेने आला हेच विसरून गेला होता. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली. तसंच, कुटुंबीयांनीही 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पण, आज त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या