नाशिक, 6 फेब्रुवारी : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तिसऱ्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश
नाशिकमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरास्ते यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा : जात देवाची नाही तर पंडितांची निर्मिती; त्याच्यासाठी आपण..., मोहन भागवत पुन्हा चर्चेत!
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का
लवकरच राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये नाशिक महापालिकेचा देखील समावेश आहे. नाशिकमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नाशिक दौऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी नाशिक दौरा केला होता. तर आता आदित्य ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र ठाकरे गटातून शिंदे गटात मोठ्याप्रमाणात इनकमिंग होत असल्यानं ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.