मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उत्तरेकडील हिमवृष्टीने महाराष्ट्र गारठला, तापमान पोहोचलं 5 अंशावर, आणखी वाढणार थंडी

उत्तरेकडील हिमवृष्टीने महाराष्ट्र गारठला, तापमान पोहोचलं 5 अंशावर, आणखी वाढणार थंडी

Weather Forecast Today: गेल्या तीन-चार दिवसांपासून जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हिमवृष्टी सुरू असल्याने उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट (Cold wave) आली आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्र देखील गारठला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 20 डिसेंबर: गेल्या तीन चार दिवसांपासून जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हिमवृष्टी सुरू असल्याने उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट (severe cold wave) आली आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्र देखील गारठला (temperature drop in maharashtra) आहे. राज्यात पुन्हा एकदा तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.5 अंशावर पोहोचला आहे. राज्यात अन्य ठिकाणी देखील प्रचंड गारवा वाढला असून थंडीच्या हुडहुडीने जनजीवन विस्कळीत झालं आहे.  नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असून अनेक ठिकाणी वेगानं किमान तापमानात घट होत आहे. नाशिकमधील निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद

झाली असून याठिकाणी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्ये अन्य ठिकाणी तापमानाचा पारा 12 अंशाच्या आसपास आहे. दुसरीकडे, नागपुरात देखील आज 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे तापमान यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे.

हेही वाचा-Omicron चा धोका..! 'या' देशात लवकरच लागणार Lockdown? नियमावली तयार

त्याचबरोबर आज अमरावती  आणि गोंदिया याठिकाणी अनुक्रमे 8 आणि 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त वर्धा (9), ब्रह्मपूरी (10), बुलडाणा (10.5), अकोला (11.3), चंद्रपूर (11.4), गडचिरोली (11.6) तर यवतमाळ याठिकाणी 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा-नाका-तोंडातून कोरोना करतो शरीरात प्रवेश; आयुष मंत्रालयाने सांगितले हे 5 उपाय

भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, येत्या 48 तासांत उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे 21 डिसेंबरपासून पुणे शहरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रात तापमान 8 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. राज्यातील किमान तापमानात प्रचंड वाढ होत असली तरी राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता नाही, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यप यांनी दिली आहे.

First published:

Tags: Nagpur, Pune, Weather forecast, महाराष्ट्र