मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Down Syndrome ला हरवत नाशिकचा स्वयंम बनला 'गोल्डन बॉय', Video

Down Syndrome ला हरवत नाशिकचा स्वयंम बनला 'गोल्डन बॉय', Video

X
नाशिकच्या

नाशिकच्या दिव्यांग स्वयंम पाटीलने पॅरा ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली आहे.

नाशिकच्या दिव्यांग स्वयंम पाटीलने पॅरा ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 8 डिसेंबर : नियतीने जरी आपल्याशी खेळ खेळला असला तरी स्वतःच्या अंगी असलेल्या आत्मविश्वासाच्या ताकदीवर स्वत:ला सिद्ध करत एक हाती यश कसे खेचून आणता येते. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे नाशिक मधील डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त जलतरणपटू दिव्यांग स्वयंम पाटील. दिव्यांग स्वयंम पाटील याने क्रीडा प्रकारातील जलतरण प्रकारात मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट आतापर्यंत कामगिरी केली आहे. त्यातच त्याने नुकत्याच आसाम मधील गुआहाटी येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक रौप्यपदकांची कमाई करून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

आई वडिलांनी दिला छंद जडून 

स्वयंम नाशिक शहरातील राणेनगर येथील जाजू विद्या मंदिर येथे इयत्ता नऊवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे स्वयंमला लहानपणा पासून डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रासलेल आहे. त्याच्यावर उपचार ही सुरू आहेत. मात्र, वडील विलास आणि आई विद्या यांनी स्वयंम अगदी सहा सात वर्षांचा आसल्यांपासूनच त्याला पोहण्याचा छंद जडून दिला आणि हळूहळू त्याला ही त्यात आवड निर्माण झाली. तो उपचाराला काहीसा प्रतिसाद देत होता आणि इकडे पोहण्याचा सराव ही करत होता. त्याच दरम्यान स्वयंमच्या आई वडिलांची स्विमिंग प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांच्या सोबत भेट झाली. सोनकांबळे यांनी आई वडिलांना शब्द दिला की,मी स्वयंमला या क्षेत्रात घडवतो आणि अखेर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू झाला.

Nashik : जुळ्या मुलांच्या आईची बाईकवर देशभ्रमंती, 21 हजार किमी केला प्रवास! Video

नाशिक महापालिकेच्या जलतरण तलाव येथे दररोज तो सराव करायचा या दरम्यान प्रशिक्षक सोनकांबळे यांनी त्याच्यातील गुण हेरले आणि स्वयंम यामध्ये चांगल यश मिळवू शकतो अस त्यांना वाटल. नंतर लहान मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला. त्यात चांगली नावीन्यपूर्ण कामगिरी करत होता. अनेक पदके त्याने मिळवली. काही दिवसांपूर्वीच आसाम गुआहाटी येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत त्याने तब्बल तीन पदकाना गवसणी घातली. त्यात दोन सुवर्णपदक आणि एक रौप्य पदकाचा समावेश होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याची माहिती प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी दिली आहे.

या प्रकारात मिळवले पदक 

स्वयंमने 100 मिटर बॅक स्ट्रोक (2.23 सेकंड ) सुवर्णपदक, 100 मिटर बटर फ्लाय स्ट्रोक (2.11सेकंद ) सुवर्णपदक,  200 मिटर वैयक्तिक मिडले रिले (4.26सेकंद ) रौप्य पदक असे दोन सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक अशा तीन पदकांची कमाई केली.

आमच्या मुलाचा आम्हाला अभिमान

आम्हाला आमच्या मुलामुळेच मान सन्मान मिळाला आहे आणि त्यामुळे आम्ही आम्ही सुरू केलेल्या एका संस्थेच्या माध्यमातून डाऊन सिंड्रोम अशा आजाराच्या पिडीत मुलांना मदत करण्याचे काम करतो, असं स्वयंमची आई विद्या पाटील यांनी सांगितलं.

First published:

Tags: Local18, Nashik