मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिकमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

नाशिकमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

4 वर्षांचा मुलगा ज्या पद्धतीने खोलीत आढळला, ते पाहून अनेकांना धक्काच बसला.

4 वर्षांचा मुलगा ज्या पद्धतीने खोलीत आढळला, ते पाहून अनेकांना धक्काच बसला.

4 वर्षांचा मुलगा ज्या पद्धतीने खोलीत आढळला, ते पाहून अनेकांना धक्काच बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Meenal Gangurde

नाशिक, 22 नोव्हेंबर : नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलाचा मृतदेह गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. या मुलाचा मृत्यू कसा झाला असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी परिचित असलेल्या आश्रमातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची गंभीर दखल गृह विभागाने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

विशाल शिंगारे या ४ वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूने उडाली खळबळ उडाली आहे. हत्या की आत्महत्या याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Crime news, Nashik