Home /News /maharashtra /

मासिक पाळी असल्याने तरुणीला वृक्षारोपण करू दिल नाही; शिक्षकाचा अजब तर्क, म्हणाले, अशाने झाडं..

मासिक पाळी असल्याने तरुणीला वृक्षारोपण करू दिल नाही; शिक्षकाचा अजब तर्क, म्हणाले, अशाने झाडं..

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वेगळी वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे.

    नाशिक, 26 जुलै : देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी नकतीच शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती (Tribal President) असून, प्रतिभाताई पाटील यांच्यानंतरच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. तसंच, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. त्याशिवाय त्या सर्वांत कमी वयात भारताचं राष्ट्रपतिपद मिळालेली व्यक्तीही ठरल्या आहेत. एकीकडे महिला सर्वोच्च स्थानी गेल्यानंतर कौतुक होत आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीला मासिक पाळी आल्यानंतर तिच्यासोबत चुकीचं वर्तन करण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? एकीकडे देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी महिलेला बसवलं जातं असल तरी दुसरीकडे आदिवासी भागातील तरुणी महिलांवरील अत्याचार कमी व्हायचं नाव घेत नाहीये. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये घडला आहे. एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिलं नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावत या युतीवर हा अन्याय केला आहे. राष्ट्रपती मुर्मू दोन पुस्तकांशिवाय पडत नाही बाहेर; एक डिक्शनरी तर दुसरं शंकराचं पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा आपला देश आधुनिक विचारांवर चालणारा समजला जातो. विशेषकरुन महाराष्ट्र तर पुरोगामी विचारांचा आहे. इथं संतापासून समाजसेवकांनी प्रबोधनातून महाराष्ट्र घडवला आहे. अशा या महाराष्ट्रात अशी घटना घडल्याने सर्वच थरातून निशेष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या ज्ञान मंदिरात भेदभाव दूर करायला हवा. तिथेच अशी गोष्ट घडत असेल तर येणारी पिढी कशी असेल? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, याप्रकरणी सदर तरुणीने तक्रार केली असून प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या