मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

"माझ्या सहकाऱ्यांना सांगा कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या प्रशासनाला आणि सरकारला धडा शिकवा", असं आवाहन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये केलं आहे.

"माझ्या सहकाऱ्यांना सांगा कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या प्रशासनाला आणि सरकारला धडा शिकवा", असं आवाहन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये केलं आहे.

"माझ्या सहकाऱ्यांना सांगा कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या प्रशासनाला आणि सरकारला धडा शिकवा", असं आवाहन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये केलं आहे.

नाशिक, 17 डिसेंबर : नाशिकमध्ये (Nashik) एका एसटी कर्मचाऱ्याने (ST Employees) आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा उल्लेख केला आहे. या कर्मचाऱ्याने सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करत असल्याने आपल्या आई-वडिलांची माफी देखील मागितली आहे. कर्मचाऱ्याचे सुसाईड नोटमधील शब्द मन सुन्न करणारे आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याने नेमकं काय लिहिलंय?

"मम्मी-पप्पा मला माफ करा. मी तुम्हाला 35 वर्ष खूप त्रास दिला. पण मी आता तुम्हाला त्रास देणार नाही. खरंच खूप खूप सॉरी! माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मुलीलापण सांगा की, मी तिला सॉरी बोललो. मी इथून पुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. माझ्या चार पॉलिसी आहेत. त्यापैकी एक पॉलिसी दहा हजार कर्ज काढल्यामुळे जमा आहे. पॉलिसीचा नंबर मोबाईलच्या मेसेजमध्ये आहे", असं कर्मचाऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : धुळ्यात एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, कर्मचारी संतापले

सुसाईड नोटमध्ये परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

संबंधित कर्मचाऱ्याने सुसाईड नोटमध्ये राज्य सरकारवरही टीका केली आहे. "मला कशीबशी नोकरी लागली. त्यात प्रशासन आणि परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आडमुठेपणामुळे आमचा पगार वाढू शकला नाही. त्यातल्या त्यात कर्ज आणि कमी पगार तेही नियमित पगार न झाल्याने खूप वैतागलो आहे. मला कुणीही समजू शकत नाही", असं कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.

'माझ्या पोरांना सांभाळा'

"मम्मी-पप्पा तुम्ही मला खूप जीव लावला. पण आता माझ्या पोरांना जीव लावा. तुम्ही मला खूप सांभाळलं. पण मी ज्या बायकोसाठी एवढं काही केलं तीच अर्धवट मुलांना सोडून गेली. त्यावेळी माझी अवस्था खूप वाईट झाली होती. पण त्यावेळी तुम्ही मला साथ दिली. माझा पगार नसताना रोज मला पेट्रोलसाठी पैसे द्यायचे. माझ्या पोरांना सांभाळा. मम्मी-पप्पा मला माफ करा", असं देखील तो म्हणाला.

'सरकारला धडा शिकवा'

"माझा तुमच्या सर्वांमध्ये खूप जीव आहे. एसटीचे विलीनीकरण होणार म्हणजे होणार. आणि माझ्या सहकाऱ्यांना सांगा कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या प्रशासनाला आणि सरकारला धडा शिकवा", असं आवाहन त्याने सुसाईड नोटमध्ये केलं आहे.

First published:
top videos