नाशिक, 2 एप्रिल : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भूसे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे बोलत असताना अचानक एक वृद्ध महिला पोस्टर घेऊन व्यासपीठाच्या दिशेन निघाली. या पोस्टरमुळे काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला. श्रीकांत शिंदे यांना पोस्टर दाखवण्यापूर्वीच या महिलेला पोलिसांनी रोखलं.
पोलिसांनी महिलेला रोखलं
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि दादा भूसे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीकांत शिंदे बोलत असताना अचानक एक वृद्ध महिला पोस्टर घेऊन त्यांच्याजवळ आली. मात्र हे पोस्टर त्यांना दाखवण्यापूर्वीच शिवसेनेचे पदाधिकारी आणि पोलिसांनी या वृद्ध महिलेला रोखलं, तिच्या हातून ते पोस्टर घेण्यात आलं. त्यानंतर खासदार शिंदे यांनी या महिलेला मंचावर बोलावलं. मात्र या पोस्टरमध्ये नेमकं काय होतं हे अद्याप अस्पष्ट आहे.
आज संभाजीनगरमध्ये मविआची सभा
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आज या सभेला उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Nashik, Shiv sena