नाशिक, 26 मार्च : “तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा 50 खोक्याला विकला गेला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मालेगावातील सभेत सुहास कांदे यांच्यावर केली. त्यांच्या या टीकेला आता सुहास कांदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
..म्हणून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला : सुहास कांदे
“खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. मी ज्या काँट्रॅक्टरांची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा. उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्ती केलं, राजीनामा देण्यापूर्वी मी स्वतः साक्षीदार आहे. या काँट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा”, असा खळबळजनक दावा सुहास कांदे यांनी केला आहे.
“आज सभा बघून उद्धव ठाकरेंची दया आली. तिकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन करायचे इकडे त्यांचा विरोध करायचा. राहुल गांधींबद्दल दुटप्पी भूमिका घेऊ नका. मुंबईत बाजू वेगळी घ्यायची, मालेगावमध्ये वेगळी भूमिका घ्यायची. पण ही फक्त टोमणे सभा झाली. उद्धव साहेब हिंदुत्व विसरून गेले आहेत”, अशी टीका देखील सुहास कांदे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मलाच समजत नाही या सभेचे काय वर्णन करायचे, आजची सभा अथांग आहे. आपल नाव चिन्ह चोरलय माझ्या हातात काही नाही तरी पण इतकी गर्दी ही पूर्वजांची आणि आई जगदंबेचे आशीर्वाद. मी मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर तुमच्यासाठी उभा आहे. अनेक वर्षांनी मालेगावात. कोरोना काळात मुंबई धारावी आणि मालेगावची परिस्थिती चिंताजनक. मालेगावच्या धर्मगुरूं सोबत चर्चा केली. तुम्ही सहकार्य केले म्हणून संकटावर मात करु शकलो. तुम्ही कुटुंबाचा सदस्य मानले.
वाचा - 'सत्ता गेल्याचं दु:ख नाही, पण..' उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; 'जिकडे तुम्ही जाल..'
गद्दारांनी नाव चिन्ह चोरले पण त्यांच्या नशिबात जिवाभावाच्या माणसाचे हे प्रेम नाही. अद्वय यांना धन्यवाद हा मर्द गडी आहे. तिथून इकडे आलाय. एकमेव संयुक्त महाराष्ट्राचा धागा आहे. गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली. किती खोक्यांना झाली? मग तुमच्या कांद्याला भाव मिळायला हवे. अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती महात्मा फुलेंच्या नावाने योजना. सत्ता आल्यावर पहिले काम केली कर्जमुक्ती. द्राक्ष बागायदारांना मदत करायची. पिकेल ते विकेल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. आज शेतकऱ्यांना भेटलो दागिने गहाण ठेवले. परंतु नातीचे लग्न लांबले. कृष्णा डोंगरेंच्या रक्ताने पत्र लिहिले पण मुख्यमंत्री वाचून भाषण करतात पण पत्र वाचता येत नाही. ह्यावर आवाज उठवणार का? यांच्या गळ्यात दोरी बांधली आहे. दिवाळीत मुख्यमंत्री रमले शेतीत. हॅलिकाॅप्टरने शेतात गेले पण बांध्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. कृषीमंत्री दिसले का? महिलांना शिवीगाळ केली. हे ह्यांचे हिंदुत्व. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्यावर कृषीमंत्री अपमानास्पद वक्तव्य करतात. केंद्रीय कृषीमंत्री काहीच करत नाही. मविआने अवकाळी पाऊस झाल्यावर तात्काळ मदत केली. सत्ता गेल्याचे दुख नाही पण चांगले काम करणारे सरकार गद्दारी करुन पाडले. खंडोजी खोपड्यांची औलाद. गद्दारांना हातात भगवा घेण्याचा अधिकार नाही. तुमची ओळख गद्दारच राहणार.
वाचा - 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना त्याच खोक्या खाली..' संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन
उद्योग सावरावा तेव्हा मविआने वीज दरात सवलत. वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवले. सगळ्यांना मुंबई जवळ होत पण मिंधे चुप बसले. उपमुख्यमंत्री म्हणतात कार्यालय नाही नेले आयुक्त फक्त गेले मग आयुक्त काय फुटपाथवर बसणार आहेत का? मुंबईचे महत्व मारायचे हे कुठले सरकार. निवडणुक आयोगाचा गांडुळ झालय. खेड आजची सभा बघितली तर कळेल शिवसेना कुठली. लाखोंच्या संख्येने आपण प्रतिज्ञापत्र दिली ती रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून नाही दिली. होय ही शिवसेना माझ्या वडिलांनी निर्माण केली मिंध्यांची नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray